For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानचा विश्वासघात विसरणार नाही अमेरिका-इराण

06:22 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानचा विश्वासघात विसरणार नाही अमेरिका इराण
Advertisement

युद्धविरामावर भडकला युएई

Advertisement

इस्रायलनंतर सर्वाधिक इराणी क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्सचा मारा झेलणारा संयुक्त अरब अमिरात (युएई) अमेरिका-इराणदरम्यान युद्धविरामावर स्वत:ची फसवणूक झाल्याचे मानत आहे. अमेरिका आणि इराणदरम्यान युद्धविराम झाला असला तरीही होर्मुझ सामुद्रधुनी अद्याप खुली झालेली नाही. याचबरोबर इराण आता ओमानसोबत मिळून होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून भरभक्कम शुल्क आकारणार आहे. इराणच्या हल्ल्यात युएईचे प्रचंड नुकसान झाले असले तरीही युद्धविराम करारात युएईच्या भरपाईबद्दल तरतूद नाही. युएईचे तज्ञ अमजद ताहा यांनी याकरता पाकिस्तानी विश्वासघाताला जबाबदार ठरविले आहे. पाकिस्तानने इराणच्या दहशतवादी शासनाला जिवंत ठेवल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानची ही मानसिकता आणि विश्वासघाताला विसरणार नाही. दहशतवाद्यांवर विश्वास ठेवणे ही जगाची सर्वात मोठी चूक आहे. ट्रम्प यांना  याचा पश्चाताप होईल. दहशतवाद्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्यांच्याशी चर्चा करू नका असे उद्गार मध्यपूर्व विषयक तज्ञ अमजद ताहा यांनी काढले आहेत.

Advertisement

शाहबाज शरीफ यांना सुनावले

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे इराणला होर्मुझ सामुद्रधुनी दोन आठवड्यांसाठी खुली करण्यास सांगू शकतात. परंतु ते यादरम्यान युएई आणि अन्य आखाती देशांवरील थेट हल्ल्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. खरी शांतता इराणच्या आक्रमकतेला प्रथम रोखल्याने येणार आहे, त्याच्याकडे डोळेझाक करून नाही अशी टिप्पणी युएईचे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सैफ अल्देराई यांनी केली.

इराणच्या शासनावर भरवसा नाही

आखाती क्षेत्रात स्थायी क्षेत्रीय सुरक्षा तोडगा अमेरिकेसोबत केवळ युद्धविरामामुळे निघणार नाही. इराणच्या वर्तमान शासनावर आखाती देशांचा कुठलाच भरवसा नाही. या क्षेत्रात इस्रायलचा प्रभाव आणखी वाढविला जावा, यात शस्त्रास्त्र प्रणाली आणि क्षेत्रीय व्यवहार सामील असावा. तसेच होर्मुझसाठी एक स्थायी सुरक्षा व्यवस्था निर्माण केली जावी अशी भूमिका युएईच्या अध्यक्षांचे राजनयिक सल्लागार अन्वर गारगाश यांनी मांडली आहे.

Advertisement
Tags :

.