For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमान चालकांसंबंधी नियमांमध्ये सुधार

06:10 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
विमान चालकांसंबंधी नियमांमध्ये सुधार
Advertisement

इंडिगोच्या गोंधळानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्र सरकारने विमान चालकांच्या विश्रांतीच्या संदर्भातील नियमांमध्ये सुधारणा केली आहे. वैमानिकांना आठवड्यातून एक दिवस विश्रांती देण्यात यावी, असा नवा नियम नुकताच केंद्र सरकारने लागू केला होता. तथापि, या नियमामुळे इंडिगोसह अनेक प्रवासी विमान कंपन्यांची वेळापत्रके ढासळली आहेत. विशेषत: इंडिगो या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीला या नियमाचा फटका बसला असून या कंपनीची अनेक विमान उड्डाणे गेल्या आठवडाभरात रद्द करावी लागली आहेत.

Advertisement

यामुळे विमान प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी इंडिगो विरोधात अनेक विमानतळांवर निदर्शनेही केली आहेत. विमानांना प्रचंड विलंब झाल्याने किंवा ती ऐनवेळी रद्द झाल्याने हजारो प्रवासी अनेक तास विमान तळांवर अडकून पडले आहेत. ही स्थिती सुधारण्यासाठी विमान प्रवास नियंत्रक प्राधिकरणाने (डीजीसीए) आता चालकांच्या विश्रांतीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे.

काय होता नियम

कोणत्याही विमान चालकाला त्याच्या साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात रजा देण्यात येऊ नये, असा नियम प्राधिकरणाच्या वतीने विमान कंपन्यांना कळविण्यात आला होता. याचा अर्थ विमान चालकांची साप्ताहिक सुटी त्यांना घ्यावीच लागणार होती. वैमानिकांची साप्ताहिक सुटी रद्द करुन त्यांना त्याची भरपाई नंतर रजेच्या स्वरुपात देण्याची सोय प्राधिकरणाने बंद केली होती. मात्र, या नव्या नियमामुळे वैमानिक उपलब्ध असूनही त्याला त्याच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी विमान उ•ाण करता येत नव्हते. यामुळे कंपनीला अनेक विमानो•ाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड कोंडी होऊन त्यांच्या प्रक्षोभाला तोंड देण्याची वेळ कंपनीवर आली होती. आता प्राधिकरणाने नियमात सुधारणा केल्याने सध्याची गोंधळाची स्थिती काही प्रमाणात सुधारण्यास साहाय्यता मिळेल अशी शक्यता आहे.

इंडिगोकडून स्वागत

विमान प्रवास प्राधिकरणाच्या या नियमसुधारणेचे स्वागत डीजीसीएकडून करण्यात आले आहे. प्राधिकरण ऐनवेळी आमच्या साहाय्याला धावून आले आहे. आता वैमानिकांचे वेळापत्रक बनविण्यासाठी सोयीस्कर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या होत असलेला विमान उ•ाणे रद्द करण्याचा प्रकार कमी होईल.  तसेच वैमानिकांनाही त्यांची सोय पाहता येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.