कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रमदानातून साकारली रुग्णवाहिका शेड व कार्यालय इमारत

05:59 PM Mar 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रणझुंजार मित्रमंडळाचा आदर्शवत उपक्रम!

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
लोकवर्गणीतून रुग्णवाहिका घेत सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या ओटवणे येथीलरणझुंजार मित्रमंडळाने आता रुग्णवाहिका ठेवण्यासाठी शेडसह कार्यालय इमारत श्रमदानातून साकारत पुन्हा एकदा सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रणझुंजार मित्रमंडळाच्या या कार्यालय वजा शेडच्या इमारतीचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवारी सकाळी करण्यात आले.दोन वर्षांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या उद्देशाने ओटवणे गावातील ३८ वर्षावरील ग्रामस्थ रणझुंजार मित्रमंडळाच्या माध्यमातून एकत्र आले. यावेळी गावात रुग्णवाहिका अभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन लोकवर्गणीतून रुग्णवाहिका घेण्याचा निर्धार करीत रणझुंजार मित्रमंडळाने लोकवर्गणीतून रुग्णवाहिकेचे स्वप्न साकार केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून रणझुंजार मित्रमंडळाने लोकवर्गणीतून रुग्णवाहिका घेत आदर्शवत सेवाभावी कार्य घडवले. त्यामुळे स्वतःची रुग्णवाहिका असलेले ओटवणे हे सह्याद्री पट्ट्यातील पहिले गाव ठरले आहे.रुग्णवाहिका आल्यानंतर ती ठेवण्यासाठी शेडची झुंजार मित्रमंडळाला प्रकर्षाने जाणीव झाली. त्यानंतर रुग्णवाहिका ठेवण्यासाठी शेडसह छोटे कार्यालय श्रमदानातून साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर झुंजार मित्रमंडळाच्या तत्पर कार्यकर्त्यांनी अवघ्या महिनाभरात ही इमारत साकारली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपले रोजचे काम व नोकरी सांभाळून रात्रीच्या वेळी श्रमदातून या इमारतीचे काम पूर्ण केले. त्यामुळे रणझुंजार मित्रमंडळाच्या या तत्पर कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे. या इमारतीच्या उद्घाटन रणझुंजार मित्र मंडळाच्या तत्पर कार्यकर्त्यांचा कौरव करण्यात आला.यावेळी सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, रविंद्र म्हापसेकर, शेखर गावकर, अजित आंगचेकर, किरण गावकर, अनंत तावडे, आनंद गावकर, नरेंद्र कविटकर, जयसिंग गावकर, बाळू गावकर, विश्वनाथ बोर्ये, आनंद मयेकर, मनोहर नाईक दशरथ शृंगारे, गजानन चिले, ज्ञानेश्वर मयेकर, दत्ताराम गवंडे, बट्टू राऊळ, रामदास गावकर, संदीप राऊळ, श्रीकांत गावकर, श्याम तावडे, विजय तावडे, निलेश माटेकर, नंदकिशोर उमळकर, संदीप गावकर, तिळा जी जाधव, मनोहर नाईक, चेतन गावकर, गुरु बुराण आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat # sindhudurg #
Next Article