रुग्णवाहिकेला आग, नवजातासह 4 जणांचा मृत्यू
07:00 AM Nov 19, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मोडासा : गुजरातच्या मोडासा शहरानजीक मंगळवारी पहाटे एका रुग्णवाहिकेला आग लागल्याने नवजात, एक डॉक्टर आणि दोन अन्य जणांचा जळून मृत्यू झाला आहे. मोडासा-धनसुरा मार्गावर रुग्ण्वाहिकेला आग लागली होती. जन्माच्या दुसऱ्या दिवशी नवजाताला पुढील उपचारासाठी मोडासा येथून अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात नेण्यात येत असताना ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत नवजात, त्याचे पिता जिग्नेश मोची (38 वर्षे), अहमदाबाद येथील डॉक्टर शांतिलाल रेंतिया (30 वर्षीय) आणि नर्स भूरीबेन मनात (23 वर्षे) यांना जीव गमवावा लागला आहे. तर एकूण 5 जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article