गोवा - बांबोळीत रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने घेतला पेट
मयुर चराटकर
बांदा
गोवा -बांबोळी येथे रुग्ण घेऊन जाणाऱ्या 108रुग्णवाहिकेने सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कोलवाळ -गोवा येथे पेट घेत जळून खाक झाली. सुदैवाने रुग्णवाहिकेवर असणाऱ्या डॉक्टर व चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर मोठी हानी झाली असती. सदर रुग्णवाहिका दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची असून सावंतवाडी उपजिल्हा येथून रुग्ण घेऊन गोवा येथे जात होती. जिल्ह्यात यूरोलॉजिस्ट नसल्याने हा रुग्ण गोवा येथे पाठविण्यात आला होता. रुग्णवाहिकेने पेट घेतल्यानंतर दुसऱ्या रुग्णवाहिकेने रुग्णाला गोवा -बांबोळी येथे पाठविण्यात आले. मात्र , एवढी गंभीर घटना घडून सुद्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून मध्यरात्री घटनास्थळी भेट किंवा त्या रुग्णाची भेट घेण्याची माणुसकी दाखवली नाही हे मोठे दुर्दैव आहे. त्यावरून जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणेवर पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.वेंगुर्ला वजराट येथील नागरिक सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे युरीन इन्फेकशन असल्याने दाखल करण्यात आला होता. मात्र ,या ठिकाणी युरोलॉजिस्ट नसल्याने त्याच्यावर उपचार करणे किंवा निदान करणे कठीण होते. त्यातच रात्री उशिरा त्याला जास्त त्रास असल्याने गोवा येथे रुग्णाला घेऊन जा असे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. त्यावरून रात्री साडे अकराच्या सुमारास 108ला कॉल केला. त्यातच सावंतवाडी येथील रुग्णवाहिका दुसऱ्या कॉलला गेल्याने त्यांना दोडामार्ग येथील रुग्णवाहिका देण्यात आली. साडे बाराच्या सुमारास दोडामार्ग येथून रुग्णवाहीका सावंतवाडी येथे दाखल झाली. त्यावर महिला डॉक्टर होती. रुग्णाला घेऊन गोवा येथे जाण्यास निघाली. रुग्ण स्टेबल असल्याने तसेच चालत रुग्णवाहीकेत बसल्याने डॉक्टर चालकाच्या शेजारी पुढे बसले होते. दरम्यान गोवा कोलवाळ येथे रुग्णावाहीका गेली असता. पुढे बसणाऱ्या डॉक्टर यांना गाडीतून धूर येते असल्याचे निदर्शनास आले त्यांनी प्रसंगावधान राखत चालकाला गाडी थांबविण्यास सांगत मागे जात रुग्णाला व नातेवाईक यांना बाहेर उतरण्यास सांगितले त्यांना घेऊन ते गाडी पासून लांब पळुन गेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जर रुग्ण सिरीयस असता तर डॉक्टर रुग्णासोबत मागे बसले असते आणि मोठी दुर्घटना घडली असती. मात्र , डॉक्टर व चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर दुसऱ्या रुग्णवाहिकेने रुग्ण गोवा येथे पाठविण्यात आला. मात्र एवढी मोठी घटना घडून सुद्धा मध्यरात्री जिल्हा आरोग्य यंत्रनेकडून कोणीच घटनास्थळी पोचले नाही हे दुर्दैव आहे. त्यावरून जिल्हा आरोग्य प्रशासनावर कोणाचा वचक नाही हे दिसून येते.गेल्या चार वर्षात रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने पेट घेण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम तरी करा किंवा रुग्णवाहिका तरी सक्षम करा अशीच मागणी होत आहे. याकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.