अंबुजा सिमेंटस् गुंतवणार 6 हजार कोटी रुपये
06:00 AM Dec 19, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली
Advertisement
सिमेंट उत्पादक कंपनी अंबुजा सिमेंटस् अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी आगामी काळात 6 हजार कोटी रुपये गुंतवण्याचा विचार करते आहे. अलीकडेच अंबुजाने सांघी इंडस्ट्रिज लिमिटेडचे 5185 कोटी रुपयांसह अधिग्रहण केले आहे.
Advertisement
अशी होणार प्रकल्पांची उभारणी
आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 1000 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मिती करण्याचे नियोजन अंबुजाने केले असून याकरीता 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. याअंतर्गत आगामी काळात कंपनी 600 एमडब्ल्यूचा सौर ऊर्जा प्रकल्प आणि 150 एमडब्ल्यूचा पवन ऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये राबवणार आहे तर राजस्थानमध्ये 250 एमडब्ल्यूचा सौर ऊर्जा प्रकल्प साकारला जाणार आहे. हे वरील उत्पादनाचे ध्येय आर्थिक 2026 पर्यंत गाठले जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. कंपनीला सिमेंटसोबत आता ऊर्जा क्षेत्रात योगदान द्यायचे आहे.
Advertisement
Next Article