For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आंबोली मंडलातील शिंदे सेनेच्या अनेक युवकांचा भाजपमध्ये प्रवेश

06:13 PM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंबोली मंडलातील शिंदे सेनेच्या अनेक युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
Advertisement
ओटवणे : प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली मंडल परिसरात शिंदे सेनेच्या अनेक युवकांनी शुक्रवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा युवा मोर्चा आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

या कार्यक्रमाला सावंतवाडीचे उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, मायकल डिसोजा, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, भाजपा सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, नगरसेविका मोहिनी मडगावकर, अॅड. सिद्धार्थ भांबुरे, भाजपा आंबोली मंडल युवा मोर्चा अध्यक्ष विनेश तावडे, दिलीप भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे आणि उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी पक्षात प्रवेश केलेल्या युवकांचा योग्य सन्मान केला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच त्यांच्या गावांतील विविध प्रश्न आणि समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

भाजप युवा मोर्चाचे आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे यांनी सांगितले की, भाजपा ज्येष्ठ नेते तथा युवकांचे आधारस्तंभ विनोद राऊळ आणि भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या कार्याने प्रेरित होऊन या युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement

या पक्षप्रवेशावेळी अनिकेत पेडणेकर, चिन्मय खवणेकर, श्रीरंग जोसोलकर, वासुदेव भगत, स्वराज सुर्वे, सदाशिव गवस, अथर्व सावंत, गौरव सावंत, राधाकृष्ण तूयेकर, सनातन बुगडे, संजय जाधव, कमलेश पेडणेकर, प्रशाम वारंग, रत्नदीप कदम, अर्जुन कासकर, विशाल कांबळे, अवधूत भगत, मयुरेश गावडे यांच्यासह अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

Advertisement
Tags :

.