For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आंबोली मंडळात शिंदे शिवसेनेच्या एकाही युवकाचा भाजपमध्ये प्रवेश नाही; शिवसेनेचे दिनेश गावडेंचा दावा

06:36 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
आंबोली मंडळात शिंदे शिवसेनेच्या एकाही युवकाचा भाजपमध्ये प्रवेश नाही  शिवसेनेचे दिनेश गावडेंचा दावा
Advertisement
ओटवणे : भाजपच्या आंबोली मंडळाच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही गावातील शिंदे शिवसेनेच्या युवकाने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. भाजपमध्ये प्रवेश केल्याचे दाखवण्यात आलेल्या युवकांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी केला आहे. केवळ वरिष्ठांची शाबासकी मिळवण्यासाठी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणल्याचा देखावा केल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपच्या आंबोली मंडळातील शिंदे शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दिनेश गावडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. संबंधित पक्षप्रवेशाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावांचाही उल्लेख नव्हता. त्यामुळे या पक्षप्रवेशाच्या दाव्याबाबत संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

Advertisement

भाजप पदाधिकाऱ्यांवर दिशाभूल केल्याचा आरोप

गावडे यांच्या म्हणण्यानुसार, आंबोली मंडळाच्या कार्यक्षेत्रातील शिंदे शिवसेनेच्या एकाही सक्रिय युवक कार्यकर्त्याने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले जात आहे, त्यांचा शिवसेनेशी पूर्वीपासून कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे शिवसेनेतील युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले.

Advertisement

स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांची पाठ थोपटून घेण्यासाठी अशा प्रकारे पक्षप्रवेशाचे चित्र उभे केले असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराला केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न असे संबोधले.

भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांपासून दूर राहण्याची समज द्यावी, असा सल्लाही दिनेश गावडे यांनी दिला. पक्षप्रवेशाच्या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.