For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुका - जिल्हा स्पर्धेसाठी आंबेवाडीचे मैदान सज्ज

10:30 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुका   जिल्हा स्पर्धेसाठी आंबेवाडीचे मैदान सज्ज
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व तालुका स्तरीय खो-खो, थ्रोबॉल व कबड्डी स्पर्धेसाठी ग्रामीणच्या आमदार व विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून मैदानाचे सुशोभीकरण करुन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका व जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो, थ्रॉबॉल, कबड्डी स्पर्धांसाठी मैदानांचे सुशोभीकरण आमदारांच्या प्रयत्नांतून करण्यात आले. या मैदानावर 1 ऑक्टोबरपासून वरील क्रीडा स्पर्धां भरविण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळा, आंबेवाडीच्या शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष विक्रम तरळे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष मल्लाप्पा सांबरेकर, उपाध्यक्ष राहुल भातकांडे, मराठा स्पोर्टस्चे विजय जंगम, प्रशिक्षक अरविंद मन्नोळकर यांच्यासह सर्व सदस्य व गावातील युवावर्ग तसेच नागरिकांच्या सहकाऱ्यांने या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी सुरूवात करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.