महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समुद्रात मृतदेह शोधणारा बनला अंबरग्रीसचा तस्कर! कोकण टू कोल्हापूर व्हाया कर्नाटकपर्यंत रॅकेट

06:52 PM Mar 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
vomit of the whale Vaibhav Khobrekar
Advertisement

देवमाशाच्या पोटातील ‘सोने’ शोधण्याचा हातखंडा

प्रशांत नाईक/मिरज

व्हेल माशाची उलटी अर्थात अंबरग्रीसला समुद्रातील सोनं म्हटले जाते. समुद्र लाटांतून हेच सोने शोधून काढण्याचा हातखंडा असलेला वैभव खोबरेकर हा सिंधुदूर्ग जिह्यातील देवबाग, मयेकरवाडीचा आपदामित्र आहे. पूरपरिस्थिती, समुद्रात बुडालेले मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्यापासून इर्शाळवाडी दुर्घटनेतही त्याने आपदा मित्र म्हणून कामगिरी बजावली होती. आता तो अंबरग्रीस तस्करी प्रकरणात पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. कोकण टू कोल्हापूर व्हाया कर्नाटकपर्यंत अंबरग्रीस तस्करीचे रॅकेट समोर आले असून, पोलिसांच्या जाळ्यात अनेक बडे मासे अकडण्याची शक्यता आहे.

Advertisement

शहरातील शास्त्री चौक, वांडरे कॉर्नरजवळ सोमवारी मध्यरात्री शहर पोलिसांच्या पथकाने व्हेलशामाची उलटी (अंबरग्रीस) तस्करी उघडकीस आणून तब्बल 19 कोटी, 17 लाख रुपयांचे अंबरग्रीस जफ्त केले. या प्रकरणात संशयीत मंगेश माधव शिरवडेकर (कोल्हापूर), संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर (सिंधुदूर्ग) आणि वैभव भालचंद्र खोबरेकर (रा. देवबाग, मयेकरवाडी, जि. सिंधुदूर्ग) या तिघांना अटक केली आहे. सिंधुदूर्ग येथून समुद्रातील अंबरग्रीसच्या 19 किलोच्या चार लाद्या कोल्हापूर येथे आणून मिरज मार्गे कर्नाटकात त्याची तस्करी करण्यात येत असल्याचे पोलिस कारवाईतून समोर आले आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव असलेल्या अंबरग्रीसची तस्करी अलीकडच्या काही वर्षात वाढीस लागली आहे. राज्यात आत्तापर्यंत वेगवेगळ्या कारवाईमध्ये दोन टनहून अधिक वजनाचे अंबरग्रीस जफ्त करुन वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, कारवाईमध्ये पकडण्यात आलेल्या व्हेल माशाच्या उलटीचे शास्त्रोक्त नमुने कोणत्याही कारवाईत प्राफ्त झाले नाहीत. त्यामुळे तस्करी होणारे समुद्री पदार्थ अंबरग्रीसच आहे का? याचे अनुमान लावण्यास अडचणी येतात. कालांतराने यातील आरोपीही सहीसलामत सुटतात.
आत्तापर्यंत गांजा, गुटखा, दारु आणि रक्तचंदन तस्करांची राजधानी समजल्या जाणाऱया महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या मिरज शहरात पहिल्यांदाच अंबरग्रीसच्या उलटीची तस्करी उजेडात आल्याने स्थानिक तस्करांचे तर हे पाप नव्हे ना, अशी पाल चुकचूकत आहे. मात्र, या तस्करीचे रॅकेट कोकण टू कोल्हापूर व्हाया कर्नाटकपर्यंत विस्तारले असून, अनेक बडे तस्कर त्यात गुंतल्याचे समोर येत आहे. या तस्करी रॅकेटमध्ये समुद्राच्या विशाल लाटांना भिडणाऱ्या एका ‘भिडू’चाही समावेश आहे. तो म्हणजे वैभव खोबरेकर.

वैभव हा सिंधुदूर्ग जिह्यातील देवबाग, मयेकरवाडीचा रहिवाशी तरुण. गेल्या काही वर्षांपासून समुद्रात पोहायचा. पूरपरिस्थितीत बचावकार्य करणे आणि समुद्रात बुडालेले मृतदेह शोधून काढून पोलिसांना तपास कामात सहकार्य करण्याचे कामही तो करत होता. इर्शाळवाडी दुर्घटनेवेळीही त्याने आपद्ग्रस्तांची मदत केली होती. कालांतराने आपदामित्र म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. मागील वर्षी हरियाणातील फरीदाबाद येथे झालेल्या आपदामित्र कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून त्याची निवड झाली होती.

समुद्राशी मैत्री आणि आपद्ग्रस्तांना मदत करण्याचा लौकीक असतानाच वैभव खोबरेकर याच्यावर आता अंबरग्रीस तस्करीचा ठपका बसला आहे. वैभव व त्याचे साथीदार सिंधुदूर्ग, मालवण येथील समुद्रातील अंबरग्रीसची उलटी शोधून काढून कोल्हापूरातील तस्कराच्या सहकार्याने कर्नाटकात त्याची विक्री करीत असल्याचे तपासून समोर येत आहे. पोलिसांचे एक पथक कर्नाटकाकडे रवाना झाले असून, अंबरग्रीस तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

का होते उलटीची तस्करी?
व्हेल अर्थात देवमाशाच्या उलटीला अंबरग्रीस किंवा ऍमबिग्रीस असे म्हणतात. व्हेल माशाच्या पाचन तंत्रामध्ये आढळणारा तो एक शुष्क पदार्थ आहे. व्हेल मासा हा स्कॉड (म्हाकुल) आणि ऑक्टोपसचे प्रचंड प्रमाणात सेवन करतो. त्यामुळे त्याला अपचन होते. तेव्हा व्हेलमासा हा समुद्रात उलटी करतो. त्यालाच अंबरग्रीस म्हणतात. या उलटीमध्ये दुर्मिळ घटक असतात. अंबरग्रीस हे अल्कोहोल, क्लोरोफार्म, इथर आणि अस्थिर तेलामध्ये विद्रव्य आहे. म्हणून कस्तुरीसारख्या फरफ्यूम आणि सुगंधी अत्तराच्या निर्मितीमध्ये स्थिरकारी घटक म्हणून त्याचा वापर होतो. एक ग्रॅमला दोन हजार, 750 रुपये प्रमाणे एका किलोसाठी 27 लाख, 50 हजार रुपये मिळतात. म्हणून व्हेलमाशाच्या उलटीची तस्करी होते.

 

Advertisement
Tags :
Ambergristhe vomit of the whalethe whaleVaibhav Khobrekar
Next Article