एंबर हर्डने जुळ्यांना जन्म
जॉनी डेपची पूर्वाश्रमीची पत्नी
हॉलिवूड स्टार जॉनी डेपची पूर्वाश्रमीची पत्नी एंबर हर्डने जुळ्या अपत्यांना जन्म दिला आहे. एंबर यापूर्वीच एका मुलीची आई आहे. 39 वर्षीय अभिनेत्रीला नव्या प्रेग्नंसीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. परंतु आता हर्ड गँग पूर्ण झाल्याचे तिने म्हटले आहे. एंबर हर्डने 2015 मध्ये हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपसोबत विवाह केला होता. त्यांचे हे नाते दोन वर्षेच टिकले. मग 2022 मध्ये त्यांच्यातील कायदेशी लढाई सुरू झाली, जी पूर्ण जगाने पाहिली. खटल्यात पराभव पत्करावा लागल्यावर एंबरने स्पेनमध्ये वास्तव्य सुरू केले, 2021 मध्ये तिने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला होता. तिच्या मुलीचे नाव ऊनाघ आहे.
हर्ड गँगमध्ये जुळ्या अपत्यांचे स्वागत करत आहे. माझी मुलगी एग्नेस आणि मुलगा ओशन आता माझा पूर्ण वेळ घेत आहेत. तर चार वर्षांपूर्वी ऊनाघचा जन्म झाला होता, तेव्हाही माझे पूर्ण जग बदलून गेले होते. आता मी तीनपट आनंदी असल्याचे उद्गार एंबरने काढले आहेत. स्वत:च्या फर्टिलिटीच्या आव्हानानंतरही स्वत:हून आणि स्वत:च्या अटींवर आई होणे माझ्या आयुष्यातील सर्वात विनम्र अनुभव राहिल्याचे तिने म्हटले आहे. एंबरला ‘एक्वामॅन’ चित्रपटामुळे मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तर ती यापूर्वी एक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडम या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.