For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंबेगाव शाळा नं. १ च्या ‘शिवरत्न संभाजी कब पथका’चे राज्यस्तरावर उल्लेखनीय यश

आंबेगाव शाळा नं  १ च्या ‘शिवरत्न संभाजी कब पथका’चे राज्यस्तरावर उल्लेखनीय यश
Advertisement

ओटवणे : मार्च २०२६ मध्ये कोल्हापूर येथील सोनतळी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय चतुर्थ चरण कब चाचणी परीक्षेत आंबेगाव जि. प. पू. प्राथमिक शाळा नं. १ च्या ‘शिवरत्न संभाजी कब पथका’ने उल्लेखनीय यश संपादन केले. कौशल्य, शिस्त आणि संघभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत पथकातील विद्यार्थ्यांनी ही राज्यस्तरीय चाचणी यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.

Advertisement

विशेष म्हणजे, राज्यस्तरीय स्काऊट, कब आणि बुलबुल चाचणी परीक्षेत सहभागी होणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली व एकमेव प्राथमिक शाळा होण्याचा मान आंबेगाव शाळा नं. १ ने मिळवला आहे.

शाळेचे कब मास्टर नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मयंक महादेव निरुकेकर, नितेश नामदेव शेळके, शौर्य सावळाराम जाधव, स्वरूप न्हानू आंगचेकर, सचिन सुमित दळवी, यज्ञेश उमेश गवळी, चैतन्य उत्तम सावंत आणि स्वराज प्रदीप सावंत या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय चतुर्थ चरण कब चाचणी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.

Advertisement

तसेच शाळेच्या बुलबुल पथकातील प्रिया शंकर राणे, त्रिशा तेजस गावडे आणि समृद्धी सचिन चव्हाण यांनीही राज्यस्तरीय चतुर्थ चरण बुलबुल चाचणी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना फ्लॉक लीडर निता नितीन सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्यस्तरीय स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेतही शाळेच्या स्काऊट पथकाने यश मिळविले. स्काऊट मास्टर नितीन नामदेव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तनिश तेजस गावडे, प्रविण सिताराम जंगले, भावार्थ नवलू झोरे आणि आर्यन रवि गावडे या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईड जिल्हा संघटक अंजली माहुरे, स्काऊट मास्टर अरविंद मेस्त्री तसेच प्रदीपकुमार म्हाडगुत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

आंबेगाव शाळा नं. १ च्या या राज्यस्तरीय यशाबद्दल कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप निऊंगरे, आंबेगावचे सरपंच शिवाजी परब, उपसरपंच रमेश गावडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तेजस्वी गावडे, उपाध्यक्ष संदेश कारिवडेकर, शिक्षणतज्ज्ञ राहुल राणे, पोलीस पाटील लक्ष्मण गावडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष राणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश गवळी, साक्षी राऊळ, प्रणाली परब, ग्रामसेवक श्री. जाधव, मुख्याध्यापक प्रदीपकुमार म्हाडगुत, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थी, शिक्षक व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

Advertisement
Tags :

.