जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात आंबेगाव शाळा नं १ चे घवघवीत यश
छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट पथकाने पटकाविली ४ बक्षिसे
ओटवणे | प्रतिनिधी
जिल्हास्तरीय स्काऊट गाईड व कब बुलबुल मेळाव्यात स्काऊट प्राथमिक विभागात आंबेगाव शाळा नं १ ने तब्बल ४ बक्षिसे मिळवत घवघवीत यश संपादन केले. कणकवली - तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयात झालेल्या या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्यात या शाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट पथकाने दोरीच्या गाठी बांधणे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मातीकाम आणि शेकोटी कार्यक्रमात द्वितीय क्रमांक तर बिन भांड्याचा स्वयंपाक मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. शाळेच्या या छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट पथकात भावार्थ नवलू झोरे, प्रविण सिताराम जंगले, तनिश तेजस गावडे, आर्यन रवी गावडे, जानू पदु शिंगाडे, साईराज सचिन गावडे, समित न्हानू कुंभार, नितेश सुरेश जाधव, विकास विठ्ठल शेळके, गौरव सुभाष गावडे या स्काउटर्सनी सहभाग घेतला होता.या विद्यार्थ्यांना शाळेचे स्काऊट मास्टर नितीन सावंत, प्रदीपकुमार म्हाडगूत, शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता मुननकर, स्नेहल कांबळे, रसिका नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आंबेगाव सरपंच शिवाजी परब, उपसरपंच रमेश गावडे, शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता मुननकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी राऊळ, उपाध्यक्षा तेजस्वी गावडे, शिक्षण तज्ज्ञ राहुल राणे, शिक्षक पालक संघ अध्यक्षा निधी सावंत, माता पालक संघ अध्यक्षा शुभदा गावडे, पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.