कॅनडातील राजदुताला भारताने बोलावले माघारी
भारत सरकारने घेतला मोठा निर्णय : निज्जर हत्या प्रकरणावरील आरोपांचे तीव्र पडसाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि कॅनडामधील संबंध पुन्हा एकदा बिघडताना दिसत आहेत. भारताने सोमवारी कॅनडाच्या राजदुताला पाचारण केले. तसेच आपल्या उच्चायुक्तांना कॅनडातून माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. पॅनडा सरकारने भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना एका प्रकरणात संशयित म्हणून घोषित केल्यानंतर भारताने त्यांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी करत पॅनडाचे सरकार त्यांना सुरक्षा प्रदान करेल की नाही यावर आपला विश्वास नसल्याचे स्पष्ट केले.
शीख कट्टरतावादी हरदीपसिंग निज्जर यांच्या कथित हत्येची चौकशी करण्यात पॅनडाने भारतीय उच्चायुक्तांनाही गोवले होते. त्यावर भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कॅनडावर हल्लाबोल करत सर्व आरोप फेटाळले आहेत. निज्जर प्रकरणात कॅनडाने भारतावर यापूर्वीही आरोप केले आहेत. गेल्यावषीच दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. त्यानंतर भारत सरकारने पॅनडाला कडक संदेश दिला आहे. निज्जर प्रकरणात कॅनडाने अद्याप कोणताही पुरावा सादर केलेला नाही. त्यातच आता कॅनडाने भारतीय उच्चायुक्तांवर गंभीर आरोप केल्यानंतर भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
कॅनडाच्या राजदुतांना पाचारण
सोमवारी भारताने पॅनडाचे राजदूत स्टीवर्ट व्हीलर यांना पाचारण केले. याप्रसंगी भारताने कॅनडाच्या कृतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पॅनडातील भारतीय उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना निराधारपणे लक्ष्य करणे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे मत भारताने नोंदवले आहे.
‘आमचा कॅनडावर विश्वास नाही’
उग्रवाद आणि हिंसाचाराच्या वातावरणात ट्रूडो सरकारच्या कृतींमुळे भारतीय अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्मयात आली आहे. भारतीय अधिकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सध्याच्या पॅनडाच्या सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळेच भारत सरकारने उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारतातर्फे कॅनडाच्या राजदुतांना सांगण्यात आले.