For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. दिनेश नागवेकर यांना राजदूत पुरस्कार

02:57 PM Jan 01, 2026 IST | अनुजा कुडतरकर
डॉ  दिनेश नागवेकर यांना राजदूत पुरस्कार
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडीतील राणी पार्वती देवी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ . दिनेश नागवेकर यांना दिल्ली येथील न्यु थिंक फाऊंडेशनने राष्ट्रीय पातळीवरील राजदूत पुरस्कार देऊन सन्मानित केले.यावेळी भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या २० व्यक्तींना आयुष मंत्रालयाचे माजी सदस्य संचालक डॉ. दिनेश उपाध्याय आणि उत्तराखंड राज्याचे माजी कॅबिनेट राज्यमंत्री श्री. कमल सिंग नेगी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सध्या ज्ञान आहे तर पदवी नाही, पदवी आहे तर ज्ञान नाही, ज्ञान व पदवी आहे तर संस्कार नाहीत अशी स्थिती आहे. आपल्याला देण्यात येणारे पुरस्कार व सन्मान चिन्हे हे शोभेची नाहीत तर आपल्या कार्याचा गौरव आहे. आपल्या कार्यासाठी प्रोत्साहन आहे. आपण ज्या कार्यक्षेत्रात कार्य करत आहात त्यात अधिक वाढ करा आणि समाजासाठी कार्य करा असे आवाहन पुरस्कार प्राप्त व्यक्तींना डॉ. दिनेश उपाध्याय यांनी या प्रसंगी केले.डॉ. दिनेश नागवेकर हे गेली ४५ वर्षे बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून, इंस्टीट्युट ऑफ इंजिनिअर, इन्स्टीट्युशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर , इंस्टिट्युशन ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन बिल्डिंग काँग्रेस अशा स्थापत्य अभियांत्रिकीमधील ते वीस संस्थाचे आजीव सदस्य आहेत. तसेच डॉ. नागवेकर सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष असून, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, दोडामार्ग हायस्कूल, चौकूळ हायस्कूल, उर्दू हायस्कूल, माणगांव हायस्कूल, मांडकुली हायस्कूल, डोंगरपाल हायस्कूल, तळवडे हायस्कूल, ओटवणे हायस्कूल, कोलगांव हायस्कूल, माणगांव ग्रंथालय, भंडारी समाज महिला वसतीगृह अशा संस्थाच्या इमारतीसाठी विना मोबदला त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
डॉ. दिनेश नागवेकर यांना  राष्ट्रीय पातळीवरील १४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.