For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंबाई जलतरण तलावाचे रुपडे पालटणार

03:54 PM Mar 25, 2025 IST | Pooja Marathe
अंबाई जलतरण तलावाचे रुपडे पालटणार
Advertisement

आमदार अमल महाडिक यांची ग्वाही

Advertisement

आमदार अमल महाडिक यांची अधिकाऱ्यांसमवेत तलावाची पाहणी

कोल्हापूर

Advertisement

कोल्हापूर महानगरपालिकेच्या बंद अवस्थेतील अंबाई जलतरण तलावामुळे जलतरणपटू आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. शासनस्तरावर पाठपुरावा करुन या तलावाचे रुपडे पालटण्याची ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली. कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार महाडिक यांनी जलतरण तलावाची पाहणी केली.

आमदार महाडिक म्हणाले, कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अंबाई जलतरण तलावासाठी निधी कमी पडू देणार नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा जलतरण तलाव व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे.जलतरण तलावाबरोबरच अत्याधुनिक फिल्टरेशन प्लांट, चेंजिंग रूम, शॉवर रूम आणि गॅलरी यांच्या उभारणीमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे निर्देश महाडिक यांनी दिले. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून जलतरण तलावा शेजारी आणखी एक लहान तलाव बांधण्यासाठी महाडिक यांनी पाहणी केली.

यावेळी अंबाई टॅंक परिसरातील बंद अवस्थेतील कारंजा,रंकाळा पदपथ उद्यानातील मोडकळीस आलेली खेळणी बदलण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. लवकरात लवकर निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असे निर्देश महाडिक यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, विनय खोपडे उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.