अंबादास दानवेंनी घेतली राजेश क्षीरसागर यांच्या शेजाऱ्याची भेट! क्षीरसागर यांच्याकडून शेजाऱ्याला झाली होती मारहाण
ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शिंदे गटाचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या शेजारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना एकप्रकारे राजकीय आव्हानच दिले आहे. ज्यांच्यावर मारहाण होऊन अन्याय झाला त्यांची भेट घेतली असून ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झाला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
VIDEO>>>पहा अंबादास दानवे यांनी घेतली राजेश क्षीरसागर यांच्या शेजाऱ्यांची भेट
कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेले अंबादास दानवे यांनी आज सर्किट हाऊस येथे जनता दरबार घेऊन शिवसैनिकांच्या तसेच जिल्हायतील नागरीकांच्या समस्या समजावून घेतल्या. यावेळी शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून मारहाण झालेले त्यांचे शेजारी राजेंद्र वरपे यांनीही विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणे मांडले. आपल्यावर मारहाण झाल्यानंतर तक्रार देऊनही राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याती तक्रार त्यांनी विरोधी पक्षनेत्याकडे केली. त्यानंतर अंबादास दानवे यांनी लागलीच पोलीस अधिक्षकांनी फोनवरून झापले आणि आज संध्याकाळी राजेंद्र वरपे यांच्या घरी चहापानाला भेट देणार असल्याचं जाहीर केलं. दानवे यांच्या घोषणेनंतर त्या परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलीसांच्या तुकड्या दाखल झाल्याने तिथे छावणीचे स्वरूप आले होते.
त्यानुसार आज सायंकाळी अंबादास दानवे यांनी राजेश क्षीरसागर राहत असलेल्या शिवगंगा अपार्टमेंटला भेट दिली. त्यांनी राजेंद्र वरपे यांच्या घरी जाऊन चहापाणी घेतले आणि अडचणी जाणून घेतल्या. चहापानानंतर बाहेर आल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, "जिथं अन्याय होत असेल तिथं गेलं पाहीजे. एव्हढं सगळं घडलं...मारहाणीचे प्रकार झाले... ज्यांच्यावर मारहाणीचे आरोप झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहीजेत. त्यामुळे अशा अन्यायग्रस्त व्यक्तीला मी भेटायला आलेलो आहे.. माझ्या इथे येण्याला विरोध झाला. विरोध होत असतो..होत राहील..मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. असे अनेक विरोध मी पाहिलेले आहेत. मला कोणाचाही विरोध इथे जाणवला नाही. पण ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायलाच पाहीजे." असेही त्यांनी म्हटले आहे.