Navratri 2025 Ambabai Temple: तिसऱ्या माळेला कोल्हापूरची अंबाबाई श्रीतारा मातेच्या रुपात
रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी मोराच्या आकारत काढण्यात आली
कोल्हापूर : शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला करवीर निवासिनी अंबाबाईची श्रीतारा मातेच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती. यात श्रीतारा मातेचा डावा पाय खालील शवावर असून, देवी मोठमोठ्याने हास्य करीत आहे. बुधवारी 1 लाख 25 हजार भाविकांनी दर्शन घेतले.
बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला गोव्यातील एका देवीच्या भक्तांने सोन्यांचा मुलामा दिलेला वैजयंतीमाला हार देवीला अर्पण केला. त्यात चांदी 802 ग्रॅम तर 51 ग्रॅम सोने असलेला 7 लाख 90 हजाराचा सोन्याचा हार अर्पण केला. याच भक्ताने गेल्या वर्षी अंबाबाईला 17 तोळे. 54 ग्रॅमचा सोन्याचा दोन पदरी साज व 590 ग्रॅमचे सोन्याचे तोडे अर्पण केले होते.
त्या सोन्यांच्या साजची त्या वेळेस किंमत 13 लाख 76 हजार 750 तर सोन्याच्या तोड्याची किंमत 16 लाख 34 हजार 26 इतकी होती. या दोन्ही दागिन्यांची एकत्रित किंमत 30 लाख 11 हजार 017 इतकी होती. बुधवारी अर्पण केलेला हार हा देवस्थान सचिव शिवराज नायकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित देण्यात आला होते.
दरम्यान रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी मोराच्या आकारत काढण्यात आली. पालखी पूजन मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख व न्यायमूर्ती एस.जी.चपळगावकर यांच्या हस्ते झाले. त्र्यंबोली यात्रेचा आढावा शनिवारी होणाऱ्या त्र्यंबोली यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बुधवारी देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्र्यंबोली टेकडीवर तयारीचा आढावा घेतला.
टेकडीवर स्वच्छतागृह, स्वच्छता, रस्ते, पार्किगची व्यवस्था याचा आढावा घेतला तर महापालिकेच्या वतीने पालखी मार्गावरील रस्त्याचे पॅचवर्क करण्यात येत आहे. भक्ती रसात भाविक चिंब नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
यात ज्ञान ज्योती महिला भजनी मंडळ, इचलकरंजी. अवधूत महिला भजनी मंडळ, कोल्हापूर, लक्ष्मी नृसिंह भजनी मंडळ, इचलकरंजी, माऊली भजनी मंडळ टेंबलाईवाडी, माऊली भजनी मंडळ, पाचगांव, स्वामी ओम स्वर तरंग भजनी, कोल्हापूर, भैरवनाथ भजनी मंडळ, म्हारुळ, स्वरशारदा संगीत विद्यालय, भरतनाटयम पद्मश्री बागडेकर, उजळाईवाडी, कोल्हापूर याचे कार्यक्रम दिवसभरात पार पडले.