Ambabai Mandir Kolhapur: भाविकांकडून अंबाबाईच्या खजिन्यात दीड कोटींचे दान, 10 पेट्यांची मोजदाद पूर्ण
यामध्ये परकीय चलन, नाणी, नोटा, सोन्या-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी भाविकांनी दान केलेल्या रकमेची अंतिम आकडेवारी गुरुवारी देवस्थान समितीकडून जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दोन महिन्यात तब्बल १ कोटी ५६ लाख ८४ हजार ५३३ रूपयेचे दान केले आहे. यामध्ये परकीय चलन, नाणी, नोटा, सोन्या-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे.
सोमवारी अंबाबाई मंदिर परिसरात असणाऱ्या गरुह मंडपात दहा दान पेठ्यांतील मोजदादीला प्रारंभ झाला होता. यामध्ये देवस्थान समितीच्या ३० कर्मचाऱ्याकडून चार दिवसात ही मोजदाद पूर्ण करण्यात आली. यामध्ये पुरुष व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
सुरक्षेमध्ये आणि सीसीटीव्ळीच्या निगराणीखाली ही मोजदाद गुरुवारी दुपारी संपन्न झाली. सोमवारपासून बुधवारपर्यंत सात दानपेट्या उघडयात आल्या होत्या या सात वानपेट्यातून जवळपास १ कोटी ११ लाखाची मोजदाद करण्यात आली होती. गुरुवारी राहिलेल्या तीन पेटयांची मोजदाद पूर्ण झाली आणि समितीकडून अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दोन महिन्यात भाविकांकडून तब्बल 1 कोटी 56 लाख रुपये दान करण्यात आले आहेत.