For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅमेझॉन मुंबईत 72 हजार कोटी गुंतवणार

06:28 AM Jan 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
अॅमेझॉन मुंबईत 72 हजार कोटी गुंतवणार
Advertisement

जवळपास 81 हजार रोजगार देणार :  मे 2023 मध्येच कंपनीची घोषणा

Advertisement

नवी दिल्ली :

अॅमझॉन वेब सर्व्हिसेज (एडब्लूएस) यांनी भारतामध्ये क्लाउड कंप्युटिंग क्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एडब्लूएस आशिया-प्रशांत (मुंबई) क्षेत्रामध्ये क्लाउडच्या गुंतवणुकीसाठी जवळपास 8.3 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे 72 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. सदरची गुंतवणूक एडब्लूएसच्या 2030 पर्यंत संपूर्ण भारतात तब्बल 12.7 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 1 लाख 10 हजार कोटी रुपयांची नियोजित गुंतवणूक योजना असल्याची माहिती आहे. ज्याची घोषणा कंपनीने मे 2023 मध्येच केली होती. अॅमेझॉनच्या क्लाउड कंप्युटिंगच्या एका जाहीर निवेदनात म्हटले आहे की, ‘एडब्लूएसने भारतात क्लाउड कंप्युटिंग क्षमता अधिक वाढवण्यासाठी तसेच  विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रात एडब्लूएस आशिया-प्रशांत (मुंबई) क्षेत्रामध्ये क्लाउडच्या नियोजित प्रकल्पासाठी 72 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Advertisement

एका अंदाजानुसार या गुंतवणुकीमधून भारताला जीडीपी स्वरुपात 15.3 अब्ज अमेरिकन डॉलरचे योगदान मिळणार आहे. स्थानिक डेटा सेंटर क्षेत्रात वर्षाला जवळपास 81,300 पेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. एडब्लूएसने 2016 ते 2019 च्या दरम्यान महाराष्ट्रात क्लाउडच्या नियोजित प्रकल्पात 3.7  अब्ज डॉलर अमेरिकन डॉलरपेक्षा अधिकची गुंतवणूक केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये काय म्हटले

गुंतवणूक योजनेला औपचारिक स्वरूप देण्यासाठी दावोसमधील जागतिक आर्थिक मंचात महाराष्ट्र सरकार आणि एडब्लूएस यांनी सामंजस्य करार केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘डेटा सेंटर्ससाठी जागतिक राजधानी बनण्याच्या आपल्या दृष्टिकोनाकडे आपण वाटचाल करत असताना हे सहकार्य केवळ आपल्या राज्याच्या तंत्रज्ञान पायाभूत सुविधांना बळकटी देणार नाही तर नवोपक्रम, आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीसाठी नवीन संधी निर्माण करेल. डेटा सेंटर्ससाठी अनुकूल वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अशा परिवर्तनकारी गुंतवणुकींमुळे महाराष्ट्राचे डिजिटल भविष्य पुढे नेण्यास मदत होईल.’

एडब्लूएस व्यवस्थापनाचे काय म्हणणे

अमेझॉन येथील ग्लोबल पब्लिक पॉलिसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष डेव्हिड झापोल्स्की म्हणाले, ‘एडब्लूएसमध्ये, क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या वाढत्या मागणीसह भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या भरभराटीसाठी आम्हाला प्रचंड क्षमता दिसते. म्हणूनच 2030 पर्यंत महाराष्ट्रात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 8.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची आमची योजना आहे.’

अमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्लूएस) म्हणजे काय?

2006 मध्ये लाँच झाल्यापासून, अॅमे वेब सर्व्हिसेस जगातील आघाडीचे क्लाउड तंत्रज्ञान प्रदान करत आहे जे कोणत्याही संस्थेला आणि कोणत्याही व्यक्तीला उद्योग, समुदाय आणि जीवन सुधारण्यासाठी उपाय तयार करण्यास मदत करते.

Advertisement
Tags :

.