2023 पर्यंत ऍमेझॉनची कर्मचारी कपात
आमच्यासाठी हा सर्वात कठीण निर्णय असल्याची सीईओंची कबुली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉनचे सीईओ अँडी जेसी यांनी नुकताच एक नवीन खुलासा केला असून यामध्ये त्यांनी कंपनी वर्ष 2023 पर्यंत कर्मचारी कपात करत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऍमेझॉनने ही कपात प्रक्रिया या आठवडय़ापासून सुरु केली आहे, तेव्हा कंपनीने घोषणा केली आहे, की डिव्हाईसेस आणि बुक्स बिजनेस या विभागातील लोकांना कमी करण्यात येणार आहे.
यावेळी सीईओ अँडी जेसी यांनी, योग्य प्रकारची योजना आखून ऍमेझॉन आगामी वर्षापर्यंत ही प्रक्रिया राबविणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. कंपनीने नेतृत्व निश्चित करुन विविध टप्प्यावर कामाची विभागणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
स्टोअरमध्ये होणार कपात
आम्ही स्टोअर आणि पीएक्सटी ऑर्गनायझेशनमधील कर्मचाऱयांची कपात करणार आहोत. परंतु हा निर्णय अन्य गोष्टींची पडताळणी करुनच घेण्यात येणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.