For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅमेझॉनची भारतात 48 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची योजना

06:17 AM Jun 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅमेझॉनची भारतात 48 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची योजना
Advertisement

महागुंतवणूक योजनेत 3.8 लाख नोकऱ्या, 1.5 कोटी लहान व्यवसाय आणि 40 लाख शाळांनाही होणार एआयचा लाभ

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अॅमेझॉनने 2026-2030 या कालावधीत भारतात 48 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर कंपनीचे सीईओ अँडी जेसी यांनी ही घोषणा केली. यामध्ये केवळ भारतातील गुंतवणुकीच्या योजनांचाच समावेश नाही, तर अॅमेझॉनच्या या महागुंतवणुकीमुळे 48 लाख नोकऱ्यांनाही आधार मिळेल. याशिवाय, शाळा आणि छोट्या व्यवसायांनाही एआयचा लाभ दिला जाईल.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेसी यांनी भारतात 48 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. आयटी आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी अॅमेझॉन 2026 ते 2030 या वर्षांदरम्यान भारतात गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या या मेगा योजनेत भारतातील निर्यातीला चालना देणे, रोजगाराला पाठिंबा देणे, लहान दुकानदारांना आणि शालेय विद्यार्थ्यांना एआयचे फायदे देणे इत्यादींचा समावेश आहे. भारतीय पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर अँडी जेसी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली.

भारतातील गुंतवणुकीसाठी अॅमेझॉनची योजना काय?

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेसी यांनी माहिती दिली की, त्यांनी भारतातील अॅमेझॉनच्या भविष्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. अॅमेझॉन पुढील 5 वर्षांत भारतात एकूण 48 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. त्यापैकी सुमारे 21 अब्ज डॉलर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले जातील.

आतापर्यंत 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

जेसी म्हणाले की, अॅमेझॉनने 2010 पासून भारतात 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी, कंपनीने 2026 ते 2030 या काळात भारतात 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ही रक्कम 48 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे. अॅमेझॉनच्या गुंतवणूक योजनेचा उद्देश 2030 पर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे 38 लाख नोकऱ्यांना आधार देणे हा देखील आहे.

शालेय विद्यार्थ्यांना एआयचे ज्ञान

कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करेल. भारतात एआयच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अॅमेझॉनकडून उपाययोजनाही केल्या जातील. ज्यामध्ये 40 लाख सरकारी शालेय विद्यार्थ्यांना एआयचे शिक्षण दिले जाईल. याशिवाय, सुमारे दीड कोटी लहान दुकानदारांनाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित माहिती दिली जाईल. अॅमेझॉनची भारतातील गुंतवणुकीची ही महायोजना केवळ भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेलाच चालना देणार नाही, तर भारतातील कोट्यावधी लोकांना रोजगारही उपलब्ध करून देईल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) लोकांमध्ये जागरूकताही वाढवेल.

Advertisement
Tags :

.