For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेझॉनकडून कर्मचाऱ्यांची कपात

06:22 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेझॉनकडून कर्मचाऱ्यांची कपात
Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

Advertisement

अमेझॉन या ऑन लाईन व्यापार कंपनीने आपल्या जगभरातील 16 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात कंपनीने अधिक कर्मचाऱ्यांची भर्ती केली होती. कारण त्या काळात ऑन लाईन अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तथापि, आता या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कपात करण्यावाचून कंपनीसमोर गत्यंतर नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कंपनी आता कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत असून कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग सेवा देण्यासाठी अधिक प्रमाणात करणार आहे. त्यामुळे कंपनीच्या क्लेरिकल कामांमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच काही डिलीव्हरी कर्मचाऱ्यांनाही कमी करण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे, त्यांना शक्य तितका आर्थिक आधार देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्याच कार्यक्षेत्रात इतर कामे मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कमी केलेले कर्मचारी त्यासाठी आवेदन पत्र सादर करु शकतात, असे कंपनीकडून त्यांना कळविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.