रेस्टॉरंटची अजब सेवा
मोफत गोष्टीसाठी आकारले जात आहेत पैसे
जगात अत्यंत वेगवेगळी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स असतात. यातील कित्येक रेस्टॉरंट्सचे स्वत:चे असे एक वैशिष्ट्या असते. येथे येणारे लोक हेच वैशिष्ट्या पाहून निवड करत असतात. एका अशाच स्पॅनिश रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना धक्का बसला जेव्हा त्यांच्या बिलामध्ये एक अत्यंत वेगळ्या प्रकारचे शुल्क दिसून आले.
आजच्या काळात सर्व गोष्टी पैशांनी खरेदी कराव्या लागत आहेत. परंतु सूर्यप्रकाश आणि हवाच मोफत मिळत आहे. अनेक ठिकाणी तर स्वच्छ हवेसाठी देखील पैसे द्यावे लागतात. जी गोष्ट आम्ही मोफत मिळवितो, त्याकरता एक रेस्टॉरंट पैसे आकारत आहे. स्पेनमधील शहर सेविलेमध्ये पर्यटकांकडून उन्हात बसण्यासाठी देखील पैसे वसूल करण्यात येत आहेत.
उन्हात बसा, पण पैसे द्या
दक्षिण स्पेनच्या सेविले शहरात हिंडण्यासाठी येणाऱ्या लोकांना एका वेगळ्याच स्थितीला सामोरे जावे लागत आहे. येथील रेस्टॉरंटमध्ये पर्यटकांना तुम्ही उन्हात बसून खाणे पसंत कराल का अशी विचारणा केली जात आहे. स्पेनमध्ये तुलनेत थंडी अधिक असल्याने प्रत्येक जण उन्हात बसून खाणे पसंत करतो. परंतु याच्या बदल्यात पर्यटकांकडून 8.50 युरो म्हणजेच भारतीय चलनात 897 रुपये आकारण्यात येत आहे. याचमुळे पर्यटक अशा रेस्टॉरंट्ससाठी नकारात्मक रिह्यू लिहित आहेत. हा प्रकार स्थानिक लोकांनाही फारसा आवडणारा नाही.
खाली राहतात टेबल्स
केवळ उन्हात बसून खाण्यासाठी रक्कम द्यावी लागणार असल्याचे कळताच पर्यटक ही कल्पना त्वरित त्यागतात. रेस्टॉरंटमध्ये बहुतांशकरून उन्हात ठेवण्यात आलेल्या टेबल्स रिकामीच राहतात. अशा स्थितीत स्थानिक लोकांचे अशाप्रकारचा व्यवसाय योग्य नसल्याचे म्हणणे आहे. तर या प्रीमियम सेवेविषयी आम्ही स्पष्टपणे लिहिले असल्याचा दावा रेस्टॉरंट्सनी केला आहे.