For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाण्यात बुडवून अमायलाचा खून

01:02 PM Mar 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाण्यात बुडवून अमायलाचा खून
Advertisement

फॉरेन्सिक टिम, फोंडा पोलिसांचा निष्कर्ष : संशयित पती-पत्नीला 6 दिवसांची पोलिस कोठडी

Advertisement

फोंडा : कसयले, तिस्क-उसगांव येथे बेपत्ता झालेल्या एका 4 वर्षीय चिमुकल्या मुलीचे डोके पाण्याने भरलेल्या बाथ टबमध्ये बुडवून निघृण खून केल्याचा निष्कर्य शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे. निघृण हत्येनंतर घराजवळ मृतदेह दफन केल्याप्रकरणी दोघांही संशयित दांपत्यांना काल शुक्रवारी फोंडा येथील प्रथम वर्ग न्यायालयाने 6 दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. अमायरा या 4 वर्षीय निष्पाप मुलीचा खूनप्रकरणी मुख्य संशयित म्हणून अवघ्या 50 मिटर अंतरावरील शेजारच्या पती-पत्नी बाबासाहेब उर्फ पप्पू अलहड (52) व पूजा अलहड (40) मूळ महाराष्ट्र रा.कसयले यांना फोंडा पोलिसांनी घटनेच्या दिवशीच ताब्यात घेतले होते. अमायरा ही बुधवार दुपारनंतर आपल्या आजीच्या घरातून बेपत्ता झाली होती. फोंडा पोलिसांनी याप्रकरणी छडा लावताना घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा धागेदोरा ठरला होता. खुनाचा घटनेचा अवघ्या 24 तासात छडा लावून फोंडा पोलिस टिमने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

पाण्यात बुडवून गुदमरल्याने 4 वर्षीय मुलीचा मृत्यू  

Advertisement

दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पूजा आणि मयत मुलाची आई यांच्यातील भांडणातून निष्पाप मुलींचा खून झाल्याचे सांगितले. अंधश्रद्धेतून निष्पाप मुलींचा बळी गेल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शवचिकित्सा अहवालातून व फॉरेन्सिक टिमने घटनास्थळावरून काढलेल्या निष्कर्षानुसार संशयित पती-पत्नीने 4 वर्षीय मुलीचे डोके पाण्याने भरलेल्या बाथ टबमध्ये बुडवून खून केला. पाण्यात बुडवण्याच्या काही चिन्हे असलेल्या मुलाचे डोके, नाक आणि तोंड एकाच वेळी दाबल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास हे मृत्यूचे कारण असल्याचे पोलिसांनी दुजोरा दिला.

मयताची आई व संशयित पूजाच्या भांडणातून 4 वर्षीय मुलींचा बळी 

4 वर्षीय मुलीची आई आणि संशयित पूजा अलहड यांच्यातील भांडण आणि जोरदार वादातून चिमुकल्याचा बळी गेल्याचे संशयितानी जबानी नोंद करण्यात आलेली आहे. मृत मुलाची आई आणि संशयित पूजा यांचे आपल्यला अवघ्या 19 वर्षात 2 अपत्ये व 25 वर्षापासून एकही मुल पदरात नाही यावरून हिणवत पूजाला मस्करी करून हिणवत असे. तो राग पूजाच्या मनात घर करून गेला होता. हा राग तिच्या मनात खदखदत होता. त्या रागाच्या भरात ती अनेकवेळा अद्दल घडविण्यासाठी संधी शोधत होती. घटनेच्या दिवशी नेमकी संधी साधून संशयित पूजाने 4 वर्षीय मुलीला मिठाई देऊन घरात नेले आणि तिची हत्या केली. याचा थांगपत्ता कुणाला लागणार नाही असा तिचा समज झाला होता. लागलीच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर शोधाशोध सुरू झाल्यामुळे मृतदेह गायब करणे जमले नाही. त्यासाठी घराच्या बाजूला खोदून तिला दफन करण्यात आले. त्यावर बाथ टबचे आच्छादन घालून काहीच न झाल्याचा आव आणला. मात्र सीसीटीव्हीने घात केल्याने प्रकरण उघडयावर आले. याप्रकरणी घटनास्थळी भेट दिलेल्या फॉरेन्सिक टीमने अंधश्रद्धेने प्रोत्साहन देणारे क़ृत्याची कोणतीच चिन्हे नसल्याचा उजाळा दिला.

संशयितांना फाशीची शिक्षा द्या-पिडीत मातेची मागणी 

मयत मुलीच्या पिडीत आईने दोघांही संशयिताना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच येथील ग्रामस्थांनी असे अमानवी कृत्य करणाऱ्या दांपत्यांना कायमचा तुरूंगवास द्यावा असे बोलून दाखविले. या दांपत्यापासून येथील लहान मुलांना धोका असल्याने संशयिताना येथून हद्दपार करणार असा पवित्रा घेतलेला आहे. संशयित बाबासाहेब हा संजीवनी साखर कारखाना येथील कॉलनीत लहानपण गेले आहे. उसगांव भागात तो पप्पू या नावाने परिचित आहे. मागील 10 वर्षापासून तो कसयले येथे स्वत:चे घर बांधून राहत असे. पदराला पोटचे मुल नसल्याने दांपत्य निराश होते. देवधर्म करूनही कोणतीच फलप्राप्ती नसल्याने  श्वानांना नियमित पोट भरून अन्न पुरवून भुतदया पाळीत सेवा करीत जीवन व्यथित करीत होती. क्षुल्लक कारणाच्या भांडणावरून निष्पाप जीव गेल्याने येथील शेजाऱ्यांनाही धक्का बसलेला आहे.

याप्रकरणी येथील स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. कायदेशीर कारवाई करण्याची आपण मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांना विनंती केली आहे. निष्पाप मुलींचा बळी घेतलेल्या संशयिताना कठोर शिक्षा करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान काल शुक्रवारी शोकाकुल वातावरणात निष्पाप मुलींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत मुलींच्या वडीलाचीही जबानी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. या घटनेचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांच्या टिममध्ये उप अधिक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षक संदीप निंबाळकर, योगेश गावकर, बन्सल नाईक, सुशांत गावकर, हवालदार केदारनाथ जल्मी, कॉन्स्टेबल शांतीलाल गावकर, शिवाजी चव्हाण, साईश मांद्रेकर यांच्या टिमने ही कौतुकास्पद कामगिरी पार पडली.

Advertisement
Tags :

.