For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमरनाथ यात्रेला 29 जूनपासून प्रारंभ

06:12 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमरनाथ यात्रेला 29 जूनपासून प्रारंभ
Advertisement

यंदा 52 दिवस चालणार यात्रा : 6 लाख भाविकांकडून दर्शनाची अपेक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पवित्र अमरनाथ यात्रेला 29 जूनपासून प्रारंभ होणार आहे. ही यात्रा 52 दिवस (19 ऑगस्टपर्यंत) चालणार आहे. मागील वर्षी ही यात्रा 1 जुलैपासून तब्बल 60 दिवस चालली होती. यंदा काश्मीरमध्ये बर्फवृष्टी उशिरा झाली असून अजूनही सुरूच आहे. गुहेच्या परिसरात 10 फुटांपेक्षा जास्त बर्फ आहे. पहलगाम आणि बालटाल ते गुहेपर्यंत यात्रेचे दोन्ही मार्ग 2 ते 10 फूट इतक्या उंचीच्या बर्फाने व्यापल्यामुळे जूनपर्यंत वितळण्याची शक्मयता कमी आहे. अशा स्थितीत लष्कर प्रत्येक ऋतूनुसार प्रवासाचा मार्ग तयार करत आहे. प्रथमच, दोन्ही मार्ग पूर्णपणे 5जी फायबर नेटवर्कने सुसज्ज असणार आहे. तसेच बर्फ वितळताच 10 मोबाईल टॉवर बसवले जाणार असून संपर्क यंत्रणा अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात येत आहे.

Advertisement

अमरनाथ यात्रेकरूंसाठी अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण मार्गावर केटरिंग, थांबा आणि आरोग्य तपासणीसाठी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी पहलगाम ते गुफा हा 46 किमी लांबीचा मार्ग 3 ते 4 फूट ऊंद होता तर बालटाल मार्ग केवळ 2 फूट ऊंद होता. आता त्याचे ऊंदीकरण 14 फूट करण्यात आल्याचे काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी सांगितले.

बर्फ हटवल्यानंतर मार्गाची दुऊस्ती केली जाईल. गेल्या वेळी 4.50 लाख भाविक आले होते. यावेळी हा आकडा 6 लाखांवर जाऊ शकतो. हा प्रवास कमी कालावधीचा असून गर्दी जास्त असेल्यामुळे अधिक व्यवस्था करण्यात येत आहे. बालटाल-अमरनाथ मार्गावरील बर्फ हटवण्याचे काम लष्कराने सुरू केले असल्याचेही बिधुरी यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय सुविधा वाढविणार

अमरनाथ श्राईन बोर्डही पहिल्यांदाच वैद्यकीय व्यवस्था वाढवत आहे. बालटाल आणि चंदनबारी येथे 100-100 आयसीयु बेड्स, अत्याधुनिक उपकरणे, एक्स-रे, अल्ट्रासोनोग्राफी मशीन, क्रिटिकल केअर एक्सपर्ट्स, कार्डियाक मॉनिटर्स, लिक्विड ऑक्सिजन प्लान्टने सुसज्ज अशी दोन पॅम्प हॉस्पिटल्सची उभारणी करत आहे. येथील हवेत ऑक्सिजन कमी असल्यामुळे यात्रा मार्गावर 100 कायमस्वरूपी ऑक्सिजन बूथ आणि मोबाईल ऑक्सिजन बूथ सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. तसेच पवित्र गुहा, शेषनाग आणि पंचतरणी येथे तीन छोटी ऊग्णालये असतील, अशी माहितीही देण्यात आली.

भक्कम सुरक्षा व्यवस्था

गेल्या वेळी दोन्ही मार्गांवर सुमारे 60 हजार सैनिक तैनात करण्यात आले होते. यावेळी, लोकसभा निवडणुकीदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या निमलष्करी दलाच्या सर्व 635 कंपन्या मतदानानंतर यात्रेत तैनात केल्या जातील. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर यात्रेला प्रारंभ होणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कमतरता ठेवली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.