अमांडा सेफ्राइडने घेतला घटस्फोट
हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता थॉमस सदोस्की आणि अभिनेत्री अमांडा सेफ्राइड हे विभक्त झाले आहेत. या जोडप्याने विवाहाच्या 9 वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मागील काही काळापासून वेगळे राहत आहोत. हा निर्णय अखेर आमच्या परिवारासाठी योग्य राहिला असल्याचे दोघांनी एका संयुक्त वक्तव्याद्वारे सांगितले आहे.
40 वर्षीफ सेफ्राइड आणि 50 वर्षीय थॉमस यांची भेट पहिल्यांदा 2015 साली ‘द वे वी गेट बाय“च्या ऑफ-ब्रॉडवे प्रॉडक्शनसोबत काम करताना झाली होती. त्याचवर्षी नंतर ते ‘द लास्ट वर्ड“च्या सेटवर पुन्हा भेटले, ज्यात त्यांनी प्रेमी जोडप्याची भूमिका साकारली होती. त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री लवकरच खऱ्या आयुष्यातील नात्यात रुपांतरित झाली. मार्च 2016 मध्ये दोघेही परस्परांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचवर्षी त्यांनी एंगेजमेंट केली, तर मार्च 2017 मध्ये दोघांनी गुपचूपपणे विवाह उरकला होता. आम्ही केवळ एक विवाह लावून देणाऱ्या इसमासोबत शहराबाहेर गेलो, केवळ आम्ही दोघं आणि स्वत:च्या विवाहाचे विधी पूर्ण पेले. हे अत्यंत सुंदर होते. जसे आम्हाला हवे होते, तसेच ते होते. केवळ आम्ही दोघेच परस्परांशी बोलत होते असे त्यावेळी थॉमस सदोस्कीने सांगितले होते. थॉमस आणि अमांडा यांना दोन अपत्यंत आहेत. दोघांनीही स्वत:च्या खासगी आयुष्याला नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून लांब ठेवले आहे.