For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही महत्त्वाचे

11:25 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही महत्त्वाचे
Advertisement

आयएमईआरच्या समागम सोहळ्याची सांगता

Advertisement

बेळगाव : केएलएस आयएमईआरतर्फे आयोजिलेल्या समागम-2024 या सोहळ्याचा सांगता समारंभ नुकताच पार पडला. सोहळ्यात बेळगावसह कोल्हापूर, अथणी, चिकोडी, हुबळी, संकेश्वर, विजापूर येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. विविध स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सांगता समारंभाला डॉ. प्रकाश मुगळी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रकाश मुगळी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तितकेच महत्त्वाचे असतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम महत्त्वाचे असतात कार्यक्रमाला कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक, संचालक डॉ. अरिफ शेख, प्रा. गौतमी मागनूर, प्रा. अतुल कदम, डॉ. जॉर्ज रॉड्रिक्स, सुनील कुलकर्णी उपस्थित होते. जैन बीकॉम कॉलेजने स्पर्धेमध्ये विजेतेपदाचे 21 हजार तर गोकाक येथील जेएसएस कॉलेजने उपविजेतेपद पटकाविले.

Advertisement
Advertisement
Tags :

.