सैन्यशक्तीसह बौद्धिक क्षमताही आवश्यक
सैन्यप्रमुख द्विवेदी यांचे वक्तव्य : युद्धाच्या बदलत्या स्वरुपाचा उल्लेख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युद्ध आता जलदपणे संपर्करहित होत चालले आहे. याचमुळे याच्या प्रत्युत्तरात सैन्यशक्तीसोबत बौद्धिक क्षमता आणि नैतिक तयारीची आवश्यकता असल्याचे सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत माणेकशॉ केंद्रात आयोजित कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले आहे. युवांची भूमिका थिंकटँग, प्रयोगशाळा आणि युद्धक्षेत्र यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असायला हवी असे वक्तव्य सैन्यप्रमुखांनी केले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही सैन्याधिकारी, विद्यार्थी आणि संरक्षणतज्ञांना संबोधित केले आहे. लोकसंख्या लाभाचा योग्य दिशेने वापर न करण्यात आल्यास तो भार ठरु शकतो असे रिजिजू यांनी म्हटले आहे. हा कार्यक्रम सैन्य अणि संरक्षण थिंक टँक ‘सेंटर फॉर लँड वॉरफेयर स्टडीज’कडून ‘चाणक्य डिफेन्स डायलॉग : यंग लीडर्स फोरम’ अंतर्गत आयोजित झाला.