अलमट्टी 80, राधानगरी धरण 93% भरले
कोल्हापूर :
अलमट्टी धरणात 44 हजार 54 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. हे धरण बुधवारी सकाळी 80.21 टक्के भरले आहे. या धरणातून 25 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर जिह्यातील 7 धरणे शंभर टक्के भरली आहेत. राधानगरी धरण 93 टक्के भरले आहे. कडवी (ता. शाहुवाडी) आणि पाटगांव (ता. भुदरगड) ही दोन धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. जिह्यातील 8 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.
कृष्णा नदी महाराष्ट्राची सीमा पार केल्यानंतर कर्नाटकातील हिप्परगी धरणाला जावून मिळते. त्यानंतर अलमट्टी धरणात पोहोचते. या धरणातून पाणी न सोडल्यास कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा वाढून कोल्हापूर आणि सांगली जिह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. अशा या अलमट्टी धरणाची पाणी पातळी 520 मीटर असून, या धरणात 44 हजार 54 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सकाळी हे धरण 80.21 टक्के भरले. या धरणातून 25 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
जिह्यातील सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुऊ असल्याने, धरणामध्ये पाण्याची आवक वाढू लागली आहे. राधानगरी धरणाच्या पाणी साठ्यात बुधवारी सकाळी 79 द.ल.घ.फु.ने वाढ झाली. त्यामुळे हे धरण 93 टक्के भरले आहे. या धरणातून 2 हजार 415 क्युसकेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुऊ करण्यात आला आहे.
धरणाचे नाव पाणी पातळी बुधवारचा पाणीसाठा
(मीटर) (दलघमी)
राधानगरी 589.12 220.48
तुळशी 612.95 77.93
वारणा 620.80 787.37
दूधगंगा 639.71 538.88
कासारी 618.80 58.99
कडवी 600.48 70.49
कुंभी 607.94 62.43
पाटगांव 625.56 101.62
चिकोत्रा 685.10 39.09
चित्री 718.90 53.41
जंगमहट्टी 726.20 34.65
घटप्रभा 742.35 44.17
जांबरे 734.00 22.78
आंबेओहोळ 685.73 35.11
सर्फनाला 699.06 18.98
कोदे 122.00 6.06