अल्लू अर्जूनची अटकेनंतर सुटका
हैदराबाद
'पुष्पा' फेम अल्लु अर्जून ला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी त्याला कनिष्ठ न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. यानंतर काहीच वेळात तेलंगणा उच्च न्यायलयाने अल्लु अर्जूनला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. तसेच अल्लु अर्जूनलाही नागरिक म्हणून जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हणले आहे.
'पुष्पा २' च्या प्रदर्शाच्या वेळी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी एका महिलेचा चेंगराचेंगरी दरम्यान मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी आहे. याप्रकरणावरून काल हैदराबाद पोलिसांनी अल्लु अर्जूनला अटक केली होती. त्यानंतर काही तासांनी अर्जूनची जामीनावर सुटका झाली.
हैदराबादच्या आयकॉनिक संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २' या सिनेमाच्या शो दरम्यान अभिनेता अल्लु अर्जूनने येथे भेट दिली. ४ डिसेंबर रोजी या सिनेमाचा प्रिमियर शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्जूनने थिएटर व्यवस्थापन आणि पोलिसांना कोणतीही पूर्व कल्पना दिली नव्हती. तसेच तो सिनेमा पाहून जाताना त्याच्या कारच्या सनरुफमधून बाहेर आला. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली आणि ही दुर्घटना झाली. गर्दी पोलिसांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेली. अचानक झालेल्या गर्दी नियंत्रण कसे ठेवणार असाही प्रश्न पोलिसांनी या प्रकरणी उपस्थित केला.
तर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, मृत्यूमुखी पडलेल्या महिलेबद्दल आणि तिच्या कुटुंबियांबद्दल कोणीच बोलत नाही आहे. एका मुलाला त्याच्या आईशिवाय त्याचे आयुष्य जगावे लागणार आहे. पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. अल्लु अर्जूनची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी हा माझी नातेवाईक आहे, तरीही आम्ही या कायदेशीर कारवाई केली. हा निर्णय घेताना आम्ही नातेसंबंधांचा विचार केला नाही. कायदा आपलं काम करेल. या प्रकरणी आम्ही तपासामध्ये हस्तक्षेप करणार नाही.