मायथोलॉजिकल चित्रपटात अल्लू अर्जुन
त्रिविक्रम श्रीनिवास यांच्याकडून दिग्दर्शन
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. अल्लूने आता स्वत:च्या आगामी चित्रपटांसाठी काम सुरू केले आहे. अल्लू अर्जुन आता दाक्षिणात्य दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या चित्रपटात दिसून येणार आहे. हा मायथोलॉजिकल धाटणीचा चित्रपट असेल.
त्रिविक्रम श्रीनिवासच्या चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम हैदराबादमध्ये सुरू आहे. दिग्दर्शकाने चित्रपटातील प्रमुख भूमिकांसाठी काही लोकप्रिय कलाकारांशी संपर्क साधला आहे. परंतु या कलाकारांची नावे अद्याप उघड झालेली नाहीत.
पुष्पा 2 प्रमाणेच हा अखिल भारतीय स्तरावर प्रदर्शित होणारा चित्रपट असेल. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत कुठली अभिनेत्री दिसून येणार यासंबंधी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. सीतारा एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. नागा वामसी याच्या निर्मितीची देखरेख करणार आहेत. त्रिविक्रमचा मागील चित्रपट ‘गुंटूर कारम’ फारसा यशस्वी ठरला नव्हता. यामुळे तो अल्लू अर्जुनसोबतचा आगामी चित्रपट यशस्वी ठरावा म्हणून अतिरिक्त खबरदारी बाळगत आहे.