For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा येथे उज्वला गॅस योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन वाटप

11:46 AM Dec 01, 2023 IST | अनुजा कुडतरकर
आचरा येथे उज्वला गॅस योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन वाटप
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.आणि मालवण भारत गॅस एजन्सी यांच्या मार्फत आचरा तिठा येथे उज्वला गॅस कनेक्शन वाटप आणि नवीन गॅस कनेक्शन अर्ज स्विकारण्यासाठी आयोजित कार्यक्रमात एकूण ३२ लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन वाटप केले गेले. सामान्यातील सामान्य ग्रामस्थांना गॅसकनेक्शन उपलब्ध व्हावे या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या हर रसोईका उज्वल इंधन अंतर्गत मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.आणि मालवण भारत गॅस एजन्सी यांच्या मार्फत आचरा तिठा येथे लाभार्थ्यांना मोफत गॅस कनेक्शन चे वाटप मालवण तालुका खरेदी विक्री संघ लि अध्यक्ष राजन गांवकर यांच्या उपस्थितीत केले गेले.

यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस, प्रफुल्ल प्रभू, जयप्रकाश परुळेकर, रुपेश हडकर यांसह खरेदी विक्री संघाचे इतर पदाधिकारी, कर्मचारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सदर शिबिरआचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या मागणीनुसार आचरा येथे घेण्यात आल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. या बाबत माहिती देताना गावकर यांनी खरेदी विक्री संघ मालवण कडे भारत गॅस एजन्सी आहे या मार्फत आत्ता पर्यंत125 पेक्षा जास्त कनेक्शन मंजूर झाली आहेत. शेवटच्या घटकांपर्यंत कनेक्शन मिळेपर्यंत हे काम सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .

Advertisement

Advertisement
Tags :

.