For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार

06:51 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार
Advertisement

मुंबईत दौऱ्यात अमित शाह यांचा घटकपक्षांना शब्द : जागावाटपावरून वाद न होण्याचे आशादायी चित्र

Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटप हा कळीचा मुद्दा असतो. पण मागील अनुभव घेत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटकपक्षांना दिला आहे. त्यामुळे महायुतीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरून वाद न होण्याचे आशादाय चित्र आहे. मंत्री अमित शाह रविवारपासून दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर वर होते.

Advertisement

यामध्ये शहा यांनी रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा केली. मात्र या चर्चेमध्ये अजित पवार यांच्या सहभाग नव्हता.

सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्या : अमित शहा

अमित शाह यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे महत्त्व पटवून दिले. जागा वाटपाबाबत वेगवेगळी विधाने न करता तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्या, असा महत्त्वपूर्ण सल्ला दिला. मात्र जागावाटपाबाबत अंतिम चर्चा दिल्लीत होईल असे सांगत, महायुतीवरील भाजपची पकड ढिली होणार नाही याचीही त्यांनी खबरदारी घेतली आहे.

निर्णयांचे तटकरेंकडून स्वागत

मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार या अमित शाह यांच्या घोषणेचे खासदार  सुनील तटकरे यांनी स्वागत केले. अजित पवार 90 जागांवरून 60 जागांवर आले असताना अमित शाहा नक्कीच मित्रपक्षांचा सन्मान राखतील असा विश्वास तटकरे  यांनी व्यक्त केला.

भाजप 125 जागा जिंकणार

दरम्यान 288 जागांच्या विधानसभेत भाजप 125 जागा जिंकणार, असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आताच्या विधानसभेत भाजपकडे 105 जागा आहेत. म्हणजेच त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या 125 जागांपैकी 50 जागा शंभर टक्के जिंकणार अशी खात्री भाजप नेत्यांना आहे. त्यातच यावेळी लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, यासाठी भाजप नेते शांत डोक्याने चाल रचत आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साह्य घेतले आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘घे भरारी’ या प्रमाणे जास्तीच्या जागा जिंकू असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अजित पवारांनी चर्चा, बैठक टाळली : विमानतळावर भेट घेतली 

पेंद्रीय गफहमंत्री अमित शहा मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. भाजप नेते त्यांच्या स्वागताला आवर्जून उपस्थित होते. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. पवार यांनी शाह यांच्याबरोबरच्या बैठका टाळल्या. मात्र विमानतळावर जाऊन त्यांनी शाह यांची भेट घेतली. त्यांच्या या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

अजित पवार रविवारी बारामतीत होते. रविवारी रात्री ते मुंबईत आले. त्यानंतर ते अमित शाहांना भेटणार होते. मात्र त्यांनी भेट घेतली नाही. मुंबईत असतानाही अजित पवार आणि अमित शाह यांची भेट न झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

रवावारी रात्री सह्याद्री अतिथीगफहावर अमित शाह यांनी भाजप नेत्यांची बैठक घेतली. तर वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली.

Advertisement
Tags :

.