For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपशी केवळ लोकसभा-विधानसभेसाठी युती

06:22 AM Dec 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
भाजपशी केवळ लोकसभा विधानसभेसाठी युती
Advertisement

निजद सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांचे स्पष्टीकरण : कार्यकर्त्यांमधील गोंधळ दूर

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

भाजपसोबतची युती ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपुरती मर्यादित आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांसाठी नाही, असे सांगत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी निजद नेते आणि कार्यकर्त्यांमधील गोंधळ दूर केला आहे.

Advertisement

युतीबाबत स्पष्टता नसल्यामुळे बेंगळूर शहरातील पक्षाच्या संघटनेसह निवडणुकीसाठी उमेदवार ओळखण्यात अडथळा येत होता. जर भाजप आणि निजदमध्ये निवडणूकपूर्व युती झाली तर कोणता प्रभाग कोणत्या पक्षात जाईल याबद्दल दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शंका होती. त्यामुळे निजदचे कार्यकर्ते निवडणुकीची तयारी सुरू करण्यासाठी पुढे-मागे पाहण्यात वेळ घालवत होते. पक्षाच्या हायकमांडने वारंवार निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले असले तरी कार्यकर्ते गोंधळातून बाहेर पडले नव्हते.

दरम्यान, एच. डी. देवेगौडा यांनी कार्यकर्त्यांमधील गोंधळ दूर करतानाच 18 जानेवारी रोजी पक्षाचा मेळावा आयोजित करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे निजदचे नेते आणि कार्यकर्ते नव्या उत्साहाने पक्ष संघटनेत गुंतले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी आपापले प्रभाग ओळखून वरिष्ठांची परवानगी घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरी आतापासूनच तयारी करण्याच्या स्पष्ट सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.