For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Municipal Council | सातारा नगर परिषद सभेत धक्काबुक्कीचा आरोप; सभागृहात खळबळ

01:25 PM Feb 27, 2026 IST | NEETA POTDAR
satara municipal council   सातारा नगर परिषद सभेत धक्काबुक्कीचा आरोप  सभागृहात खळबळ
Advertisement

               पहिल्याच सातारा नगर परिषद सभेत वादाची ठिणगी

Advertisement

सातारा - सातारा नगर परिषदच्या पहिल्याच सभेत महिला नगरसेविका सावित्री बडेकर यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बडेकर यांनी सभागृहात केली.

बडेकर यांनी सभेत बोलताना सांगितले की, मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अयोग्य वर्तन करत धक्काबुक्की केली. हा प्रकार गंभीर असून याची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, मुख्याधिकारी विनोद जळक यांनी आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली. “मी कोणालाही धक्काबुक्की केलेली नाही. माझ्या केबिनचे दोन्ही दरवाजे लॉक करून ठेवण्यात आले होते आणि मला बाहेर पडू दिले जात नव्हते. ज्या मार्गाने वाट मिळाली, त्या मार्गाने मी बाहेर पडलो. सीसीटीव्ही फुटेज तपासून वस्तुस्थिती स्पष्ट होईल,” असे त्यांनी सांगितले. उलट बडेकर यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला.

Advertisement

या घटनेनंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्षांनी संपूर्ण घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत वादाची ठिणगी पडली असून पुढील चौकशीअंती नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.

Advertisement
Tags :

.