एकनाथ शिंदेंनी मालवणात आणल्या पैशांच्या बॅगा
माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप ; भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही मालवणात पैशांचे वाटप
मालवण/प्रतिनिधी
एकीकडे निलेश राणेंनी भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले. परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.श्री. नाईक पुढे म्हणाले की, हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.