सत्यविजय भिसे खून प्रकरणात केसरकरांनी तेलींना गुंतवले याचा मी साक्षीदार
बबन साळगावकरांचा खळबळजनक आरोप ; एक दिवस केसरकरच जेलमध्ये जातील ; साळगावकरांची टीका
सावंतवाडी | प्रतिनिधी
कणकवली येथील तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यविजय भिसे खून प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे वारंवार फोन करून राजन तेली यांचे नाव या प्रकरणात गुंतवा असे सांगत होते. आणि त्यांच्यामुळेच तेली नाहक जेलमध्ये गेले .नेहमी प्रत्येक निवडणुकीत अपप्रवृत्ती विरोधात मी लढत आहे असे सांगणारे हेच केसरकर अपप्रवृत्ती आहेत असा खळबळजनक आरोप सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा जुने शिवसैनिक बबन साळगावकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शिवसेना माजी तालुकाध्यक्ष उमेश कोरगावकर यांनीही केसरकर यांच्यावर टीका करताना श्री केसरकर हे फसवे आणि खोटारडे आहेत. आम्हा तीन नगरसेवकांच्या सहकार्याने केसरकर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बनले बनले
त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे माजी आमदार राजन तेली यांनी शब्द टाकला आणि केसरकर आम्हा तीन नगरसेवकांच्या साथीने नगराध्यक्ष झाले. आणि आज तेच केसरकर जनतेची फसवणूक करत आहेत असे ते म्हणाले.
श्री साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना धक्कादायक बाब उघड केली आहे .सत्यविजय भिसे खून प्रकरणात राजन तेलींना केसरकर यांनी कसे गुंतवले याचा साक्षीदार मी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्री तेली यांना नाहक सहा महिन्याची जेलची हवा खावी लागली यामागे केसरकर यांचा मोठा हात आहे. प्रत्येकाला मी जेलमध्ये टाकेन असे सांगणारे केसरकर एक दिवशी स्वतः जेलमध्ये जातील. असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले गेल्या पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत मी निवडणुकीला सामोरे गेलो होतो आणि त्यावेळीही केसरकर सावंतवाडीत अपप्रवृत्ती शिरकाव करत आहे अशा अपप्रवृत्तीला ठेचा आणि आताही ते तेच म्हणत आहेत.नेमकी अपप्रवृत्ती कोणती खरंतर केसरकर हीच एक अपप्रवृत्ती आहे त्यामुळे या अपप्रवृत्तीला आता जनतेने कायमचे घरी बसवावे असे त्यांनी स्पष्ट केले.