‘ऑल वी इमेजिन एज लाइट’ ओटीटीवर
समीक्षकांकडून कौतुक झालेला चित्रपट ‘ऑल वी इमेजिन एज लाइट’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पायल कपाडियाकडून दिग्दर्शित पुरस्कार विजेता चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. चित्रपटात दोन मल्याळी नर्सेसच्या परस्परांशी जोडले गेलेल्या जीवनाला दर्शविण्यात आले आहे. ऑल वी इमेजिन इज लाइट हा चित्रपट 3 जानेवारीपासून स्ट्रीम होणार आहे. फेस्टिव्हल डी कान्स ग्रँड प्रिक्स विजेता आणि 2 गोल्डन ग्लोब नामांकनासोबत पायल कपाडियाचा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
कनी कुसरुतिने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याची पटकथा वाचल्यावर सर्वात प्रभावित करणारी बाब ही प्रभाचा स्वशोध आणि शांत परिवर्तन होती. पायलसोबत काम करणे एक सुखद अनुभव होता. पायल ही प्रत्येकाचे मत लक्षपूर्वक ऐकून घेते आणि कलाकारांना स्वत:ची व्यक्तिरेखा जाणून घेण्यास मदत करते, असे कनीने म्हटले आहे. ऑल वी इमेजिन इज लाइट या चित्रपटात कनी कुसरुति, दिव्य प्रभा, छाया कदम, हृदु हारून आणि अजीस नेदुमंगद हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात महत्त्वाचा पुरस्कार मिळविला होता.