For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यापुढील सगळी वर्षे जनतेसाठीच : आ. निलेश राणे

11:56 AM Jun 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
यापुढील सगळी वर्षे जनतेसाठीच   आ  निलेश राणे
Advertisement

गोळवण गावातील उबाठा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Advertisement

फोटो (अमित खोत, मालवण)

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना जोमाने वाढत आहे. जिकडे बघावे तिकडे पक्षप्रवेश होत आहेत. मालवण कुडाळ मतदार संघातही दररोज शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहेत. जनतेचा असलेला विश्वास सार्थ ठरवताना गावागावातील सर्व विकासकामे पुर्ण केली जातील. अधिकाधिक विकासनिधी मतदारसंघात आणला जाईल. विकासकामे होत असताना ती दर्जेदार झालीच पाहिजे. कामात कोणतीही तडजोड होणार नाही. जे जनतेच्या हिताचे त्यालाच सर्वाधिक प्राधान्य असेल. ज्या धनुष्यबाण चिन्हावर राणे साहेबांची राजकीय सुरुवात झाली त्याच धनुष्यबाण चिन्हावर माझी दुसरी इनिंग सुरु झाली आहे. आता यापुढील सगळी वर्षे जनतेसाठीच असतील. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी गोळवण येथे बोलताना व्यक्त केले. गोळवण आमराई रिसॉर्ट येथे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मालवण तालुक्यातील गोळवण, कुमामे डीकवल गावातील उबाठा पक्षातील विभागप्रमुख भाऊ चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत पक्षप्रवेश केला. हा सामूहिक पक्षप्रवेश केवळ राजकीय बदल नसून, ग्रामीण भागातील जनतेचा शिवसेनेवर असलेला विश्वास आणि निष्ठेचा ठोस पुरावा आहे. शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे. या नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे गोळवण गावातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, ग्राप सदस्य साबाजी गावडे, गोळवण शाखाप्रमुख विकास परब, राजन माणगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवा उद्योजक सुशांत घाडीगांवकर, दादा नाईक, कमलेश प्रभू, देवली सरपंच शाम वाक्कर, महान सरपंच अक्षय तावडे, पोईप सरपंच श्रीधर नाईक, वेरळ उपसरपंच शामा चव्हाण, शामसुंदर चिरमुले, तुकाराम जाधव, मुरारी गावडे, प्रशांत परब, सुनील गावडे, मनीष जाधव, बाबुराव चिरमुले, विजय परब, नामदेव गावडे, दिवाकर परुळेकर, निवेदक सागर जाधव यांसह अन्य पदाधिकारी व गावातील जेष्ठ ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisement

मोठया संख्येने पक्षप्रवेश

उबाठा विभागप्रमुख भाऊ चव्हाण यांसह गोळवण माजी सरपंच तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रज्ञा चव्हाण, डिकवल शाखाप्रमुख भालचंद्र गावडे, शाखाप्रमुख एम. जी. गावडे, युवासेना शाखाप्रमुख निलेश गावडे, डिकवल बुथप्रमुख प्रशांत डिकवलकर, युवासेना उपशाखाप्रमुख दत्ताराम गावडे, माजी पोलीस पाटील मोहन पवार, गोळवण बुथप्रमुख कृष्णा चिरमुले, गटप्रमुख जगु चिरमुले, युवासेना उपशाखाप्रमुख प्रवीण चिरमुले, बुथप्रमुख नामदेव गावडे, गट प्रमुख ताता दाभोलकर, माजी शाखाप्रमुख एकनाथ चव्हाण, गटप्रमुख दिगंबर चिंबदरकर, कुमामे शाखाप्रमुख गणेश मुणगेकर, गटप्रमुख महादेव पवार, डिकवल युवासेना प्रमुख विराज राणे, चव्हाणवाडी गटप्रमुख रवींद्र चव्हाण, देवस्थान कमिटी गोळवण उपाध्यक्ष प्रल्हाद नाईक, गोळवण माजी उपशाखाप्रमुख प्रकाश नाईक, गटप्रमुख मयूर नाईक यांसह असंख्य उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत माहिती भाऊ चव्हाण यांच्या वतीने देण्यात आली आहे.

अभिमान वाटावा असे आमदार निलेश राणे यांचे विकासकार्य : दत्ता सामंत

आमदार निलेश राणे यांचे विकासकार्य अभिमान वाटावे असे आहे. त्यांच्या विकास कार्यावर सर्वत्र पक्षप्रवेशांचा धमाका सुरु आहे. विकासकामांचा प्रत्येक शब्द आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुर्ण होत आहेत. विधानसभेत त्यांची भाषणे त्यांचे व्हिजन व अभ्यासूपणा स्पष्ट करतो. दहा वर्षात येथील माजी आमदाराने काहीच केले नाही. जनतेने घरी बसवले आणि आपले हक्काचे आमदार निलेश राणे विजयी केले. विकासाची गती अशीच कायम राहील. खासदार राणे साहेबांच्या मार्गदर्शनात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ विकासकामात अव्वल ठरेलं. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

विकास कामांचा धडाका सुरु

हा भाग राणे साहेबांचा बालेकिल्ला होता आणि पुढेही राहील. मालवण कुडाळ मतदारसंघात आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख धडाडीने करत आहेत. जनतेची गरज ओळखून तात्काळ विकासकामे होत आहेत. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरु असल्याचे जिप माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदाळकर यांनी स्पष्ट केले.

आमदार निलेश राणे प्रत्येकाला आपले वाटणारे नेतृत्व : भाऊ चव्हाण

आमदार निलेश राणे यांचे विकासकार्य तसेच प्रत्येक व्यक्ती सोबत त्यांची असलेली आपुलकी पाहता ते प्रत्येकाला आपले वाटतात. मागील काळात सर्व विकासकामे ठप्प झाली, निधीच आणता आला नाही. मात्र आमदार निलेश राणे यांनी विकास कामांचा धडाका लावला. त्यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन आपण व सहकारी शिवसेनेत पक्षप्रवेश करतं आहोत. कोकणचे भाग्यविधाते राणे साहेबच आहेत. त्यांनी विकास केला कार्यकर्ते घडवले त्याच प्रमाणे धमक असलेले नेतृत्व म्हणजे आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचेही कार्य मोठे आहे. आज हा कार्यक्रम होत असताना असलेली गर्दी मी उबाठा पक्षात असताना आमच्या कार्यक्रमाना कधीच नव्हती. माणसे जोडण्याची ही ताकद राणे कुटुंबात आहे. असेही भाऊ चव्हाण म्हणाले. यावेळी देवली सरपंच शाम वाक्कर यांनीही विचार मांडले.

दत्ता सामंत अनेक कामे स्वखर्चातून करतात

आम्हाला राणे साहेबांची शिकवण आहे. जनतेचे प्रश्न तात्काळ सुटले पाहिजेत. त्या मार्गदर्शनात आम्ही काम करत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत जनतेची अनेक कामे स्वखर्चाने करतात. संघटना वाढवत आहेत. रोज पक्ष प्रवेश होत आहेत. उपनेते संजय आंग्रे यांचेही मार्गदर्शन साथ लाभत आहे. शिवसेना सर्व पदाधिकारी चांगले काम करतं आहेत. शिंदे साहेबांना अपेक्षित संघटन कार्य करतं असताना सर्वांचे मोलाचे योगदान लाभत असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

मालवण-कुडाळ अग्रेसर व्हावा हेच लक्ष

मालवण कुडाळ मतदारसंघ अग्रेसर व्हावा हेच आपले लक्ष आहे. विधिमंडळ, मंत्रालय स्तरावरून जास्तीत जास्त निधी आणण्याचे प्रयत्न आहेत. त्यात यश मिळतं आहे. शिंदे साहेबांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणणार. एमआयडीसी मध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सोई सुविधा सुरु आहेत. पुढील वर्षात जास्तीत जास्त रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.