भालावल गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य !
खासदार विनायक राऊत यांचे भालावलवासियांना आश्वासन
ओटवणे प्रतिनिधी
भालावल गावची प्रलंबित वीज समस्या सोडवण्यासह या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी असो अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी भालावलवासीयांना दिली. भालावल शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याला खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे नेते बाळा गावडे, शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, माजगाव माजी सरपंच आबा सावंत, सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश परब, जेष्ठ ग्रमस्थ झिलु परब, ग्रामपंचायत सदस्य अमित गुळेकर शतक महोत्सव समिती अध्यक्ष महेश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम परब, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नम्रता कोठावळे, माजी उपसरपंच अशोक परब, वामन परब, श्रीकृष्ण परव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाळा गावडे यांनीही भालावल गावच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्याची ग्वाही दिली. रुपेश राऊळ यांनी शिवसेनेच्या माध्यमातून यापूर्वीही भालावल गावाच्या विकासासाठी निधी देण्यात आला असून यापुढेही गावाच्या विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. जान्हवी सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय परब यांनी केले.