For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाळणेकोंड धरणाचे सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडले

05:16 PM Jul 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पाळणेकोंड धरणाचे सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडले
Advertisement

मुख्याधिकाऱ्यांनी केली नारळ अर्पण करीत जलपूजा

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी - गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे सावंतवाडी नगरपरिषदेचे पाळणेकोंड धरण पूर्ण भरून वाहत आहे. त्यामुळे आता शहराला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. पाळणेकोंड धरणाचे सर्व सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडले असून धरण तुडुंब भरल्यामुळे सावंतवाडी शहरासाठी आनंददायी ही आनंदाची बातमी आहे . सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा होणारे पाळणेकोंड धरण दरवर्षी जुलै महिन्यात भरते आणि हे धरण भरल्यानंतर गेली कित्येक वर्षांपासून नारळ अर्पण करून सदर धरणाची पूजा करण्याची अनोखी प्रथा नगरपालिकेने जपली आहे. यावर्षीही धरण तुडुंब भरले असून आज मंगळवारी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या शुभहस्ते नारळ अर्पण करून जल पूजा करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे भाऊ भिसे , पिळणकर उपस्थित होते. पाळणेकोंड धरण हे सावंतवाडी शहराला 24 तास पाणीपुरवठा धरण आहे.

Advertisement
Advertisement

.