महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा चौफेर विकास

12:25 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे प्रतिपादन, पेडणेत गोवा मुक्ती दिन उत्साहात

Advertisement

पेडणे : गोवा मुक्ती नंतर गोवा राज्याचा इतर राज्याच्या तुलनेत झपाट्याने विकास झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना देशभरात आणि राज्यभरात लोकांना मिळत आहेत. डॉ. प्रमोद सावंत हे धडाडी असलेले मुख्यमंत्री असून त्याच्या नेतृत्वाखाली राज्याचा चौफेर विकास होत आहे. येणाऱ्या काळातही हा विकास झपाट्याने होणार असून 2047 मध्ये भारत हा विकसनशील देश म्हणून संपूर्ण जगात नाऊपाला येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे असे प्रतिपादन  मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पेडणे येथे केले . पेडणे येथे सरकारी पातळीवर सरकारी संकुल परिसरात गोवा मुक्ती दिन कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार अनंत मळीक, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशांवकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, स्वातंत्र्य सैनिक संजय प्रभू देसाई आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

गोवा मुक्तीसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वतंत्र सैनिकांनी जे बलिदान दिले त्यामुळेच गोवा मुक्त झाला याचे स्मरण सर्वांनी ठेवायला पाहिजे. गोवा छोटे राज्य जरी असले तरी एक प्रगतशील राज्य म्हणून याची देशात ओळख आहे. पर्यटन स्थळ म्हणून गोव्याची ओळख झाली आहे, असे मंत्री हळर्णकर यांनी सांगितले. सुऊवातीला मंञी निळकंठ हळर्ण यांच्या हस्ते ध्वजारोहाण करण्यात आले.  पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी स्वागत केले. यावेळी  भगवती स्कूलच्या तसेच व्हायकाऊंट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सूत्रसंचालन रामदास डावरे यांनी केले. यावेळी पेडणे पालिकेचे उपनगराध्यक्ष आश्विनी पालयेकर ,  नगरसेविका उषा नागवेकर , नगरसेवक माधव सिनाई,    नगरसेवक शिवराम तुकोजी , नगरसेवक विशाखा गडेकर नगरसेवक मनोज हरमलकर, तसेच निवृत्ती पोलीस अधीक्षक आप  तेली , माजी उपनगराध्यक्ष नारायण उर्फ जिल्हा मयेकर, पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव परवार , पेडणे  क्रीडा अधिकारी अर्जुन गडेकर , विविध विद्यालयांचे  शिक्षक, पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article