ओटवणेच्या विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य !
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची ओटवणेवासियांना ग्वाही
ओटवणे : प्रतिनिधी
ओटवणे गावाच्या विकासासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षात लाखो रुपयांचा निधी देण्यात आलेला असून यापुढेही शिवसेनेच्या माध्यमातून ओटवणे गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी ग्वाही शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ओटवणे वासियांना दिली.माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या ओटवणे देऊळवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण शुभारंभ प्रसंगी संजू परब बोलत होते. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, युवा शिवसेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडिस, ओटवणे सरपंच दाजी गावकर, सरपंच संतोष कासकर, सत्यवान बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा गावकर, मनाली गावकर, माजी सरपंच उत्कर्षा गावकर, माजी उपसरपंच बाबाजी गावकर, शिवसेना माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर, शाखाप्रमुख मंगेश चिले, बाळकृष्ण भगत, सखाराम गावकर, दिगंबर गावकर, चेतन गावकर, जयसिंग गावकर, जिजी गावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अशोक दळवी यांनीही ओटवणे गावाच्या प्रलंबित विकास कामासाठी निधी देण्याची काही दिली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओटवणे देऊळवाडी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्गी लागल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.