कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओटवणे गावाच्या प्रलंबित विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य

04:50 PM May 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची ओटवणेवासियांना ग्वाही

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ओटवणे गावाच्या विकासासाठी आतापर्यंत भरघोस निधी देण्यात आला असून या गावाला मंडळाला रुग्णवाहिकाही देण्यात आली आहे. त्यामुळे या गावाच्या प्रलंबित विकासासाठी शिवसेनेच्यावतीने यापुढेही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी ओटवणेवासियांना दिले दिले.
ओटवणे श्रीकृष्ण मंदिराच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संजू परब बोलत होते. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, माजगाव विभागप्रमुख उमेश गावकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, बावळाट माजी उपसरपंच बाबल बुराण, अक्षय वाडकर, सरमळे शाखाप्रमुख संजय गावडे, बाळकृष्ण गवळी, एकनाथ बोर्ये, प्रसिद्ध भजनी बुवा प्रकाश चिले, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, मंगेश चिले, प्रथमेश बोर्ये, गजानन चिले, विश्वनाथ बोर्ये रामचंद्र भालेकर, उमेश कोटकर, गुरुनाथ बोर्ये, नाना चिले, शांताराम शृंगारे, दशरथ शृंगारे आदी उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्ण मंदिर आणि श्रीकृष्ण सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्राच्यावतीने संजू परब, नारायण राणे, बबलू गावकर, अक्षय वाडकर, बाबल बुराण यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी प्रलंबित विकास कामाबाबत लक्ष वेधले असता संजू परब यानी यासाठी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यावेळी नारायण राणे यांनीही ओटवणे गावातील प्रलंबित विकास कामासाठी शिवसेनेच्या माध्यमातून निधी देण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन शांताराम शृंगारे यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # sanju parab
Next Article