निसर्गरम्य असनिये गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची ग्वाही
ओटवणे : प्रतिनिधी
या जिल्ह्याच्या पर्यायाने जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. त्यात निसर्गरम्य असनिये गावाशी आपले जवळचे नाते असून आपल्या वाटचालीत असनियेवासियांची नेहमीच साथ असते. त्यामुळे या गावाच्या विकासासाठी नेहमीच पाठबळ दिली असून यापुढेही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी असनियेवासियांना दिली.असनिये येथील दिवाळी पहाट मंडळ, श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमोद कामत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक एम. डी. सावंत, डेगवे माजी उपसरपंच मधुकर देसाई, राजन देसाई, प्रवीण देसाई, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, आत्माराम गावडे, विनेश गवस, असनियेचे माजी ग्रामसेवक मुकुंद परब, कृषी अधिकारी मिलिंद निकम, पोलीस पाटील विनायक कोळापटे, शरद सावंत, दिलीप सावंत, संजय सावंत आदी उपस्थित होते.यावेळी एम. डी. सावंत यांनी एक कर्तव्यनिष्ठ आणि विकासाचे व्हिजन असणारा एक आदर्श नेता म्हणून प्रमोद कामत यांच्याकडे कडे पाहिले जात असून असनियेच्या परिसराच्या विकासासाठी त्यांच्याकडून आदर्शवत कार्य घडेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात व्यासपीठावरील मान्यवरांसह असनियेचे माजी ग्रामसेवक मुकुंद परब, कृषी अधिकारी मिलिंद निकम यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत यांनी, सुत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक परेश देसाई तर आभार लिपिक जी. बी. सावंत यांनी मानले.