ओटवणेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य : संजू परब
ओटवणे गावठाणवाडी रस्त्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ
ओटवणे : प्रतिनिधी
ओटवणे गावाच्या विकासासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षात लाखो रुपयांचा निधी देण्यात आलेला असून यापुढेही शिवसेनेच्या माध्यमातून ओटवणे गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी ग्वाही शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ओटवणेवासियांना दिली.माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यामार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या ओटवणे गावठणवाडी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण शुभारंभ प्रसंगी संजू परब बोलत होते. यावेळी आरोंदा जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठाणकर, चराटे पंचायत समिती सदस्य उत्कर्षा गावकर, ओटवणे सरपंच दाजी गावकर, माजी उपसरपंच बाबाजी गावकर, युवा शिवसेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडिस, शिवसेना माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर, विभाग प्रमुख राजू कुबल, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष गुंडू जाधव, ग्रामपंचायत सदस्य मनाली गावकर, स्वरा बबलू गावकर, शिवसेना शाखाप्रमुख मंगेश चिले, संजय कविटकर, बाबा मळेकर, रमेश गावकर, उमेश भास्कर गावकर, शंकर गावकर, ओंकार गावकर, प्रतीक गावकर, सुरज गावकर, नाना सावंत, बाबल जाधव, गुंडू मुळीक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. तर पंचायत समिती सदस्य उत्कर्षा गावकर या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले. गेल्या दोन वर्षांपासून गावातील या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र आता या रस्त्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांसह वाहन चालकांमधून समाधान व्यक्त केले आहे.