For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज दिल्ली दौऱ्यावर

06:46 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज दिल्ली दौऱ्यावर
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी दिल्लीला जाणार आहे. शिष्टमंडळाकडून केंद्रीय कृषी, वन तसेच अन्य संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन राज्याच्या विविध मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांचे हित आणि दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळवण्याच्या दृष्टीने हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्यातील विशेष संयुक्त अधिवेशनात कस्तुरीरंगन अहवालानुसार पर्यावरण संवेदनशील क्षेत्र जाहीर करण्यास विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. याबाबत राज्याची एकमताची भूमिका केंद्रीय वनमंत्र्यांसमोर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. तसेच राज्यातील 200 हून अधिक तालुके दुष्काळाने बाधित असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्राकडून अंतरिम तसेच जास्तीत जास्त दुष्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार केंद्रातील मंत्र्यांना दुष्काळाची परिस्थिती, आकडेवारी आणि कागदपत्रांसह समजावून सांगणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.