कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक पातळीवर ‘ऑल इज नॉट वेल’

05:47 AM Oct 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘युएन’मध्ये चीन-पाकिस्तानचे नाव न घेता जयशंकर यांनी केले लक्ष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बहुपक्षीय सहकार्यावर विश्वास राखण्याची गरज असल्याचे मत मांडतानाच संघटनेसमोरील आव्हानांवरही गंभीर चिंता व्यक्त केली. जागतिक पातळीवरील परिस्थिती ‘ऑल इज नॉट वेल’ म्हणजेच ‘सर्वकाही सुस्थितीत नाही’ अशीच असल्याचे सांगत जग सामाजिक-आर्थिक प्रगती, व्यापार असंतुलन आणि पुरवठा साखळी अवलंबित्व यासारख्या समस्यांनी ग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही जगाला एकत्र येऊन जागतिक आव्हानांना तोंड देण्याचे आवाहन केले.

संयुक्त राष्ट्रांच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जगातील सर्वात मोठ्या बहुपक्षीय व्यासपीठावर ‘सर्व काही ठीक नाही’ असा स्पष्ट संदेश भारताने दिला. संघर्ष आणि अविश्वासाच्या या काळात शांततेची गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे, परंतु संयुक्त राष्ट्र (यूएन) त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरत आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. कोणत्याही देशाची नावे न घेता त्यांनी दहशतवादाबद्दल चीन आणि पाकिस्तानच्या दुटप्पी मानकांवर टीका केली आणि अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशांवर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केले.

जागतिक व्यासपीठावरील वादविवाद अत्यंत ध्रुवीकृत झाले आहेत आणि अनेक प्रमुख निर्णय जगाच्या खऱ्या गरजा आणि भू-राजकीय प्राधान्ये प्रतिबिंबित करत नाहीत. संयुक्त राष्ट्राला त्याची प्रासंगिकता टिकवून ठेवण्यासाठी गंभीर सुधारणांची आवश्यकता आहे. भारत नेहमीच संयुक्त राष्ट्राचा एक मजबूत समर्थक राहिला असून भविष्यातही सकारात्मक राहील, असे जयशंकर म्हणाले.

जागतिक शांततेबाबत भारताच्या भूमिकेवर भर

एस. जयशंकर यांनी जागतिक शांततेत भारताच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. भारत नेहमीच शांतता मोहिमेत सक्रिय राहिला आहे. ही आम्ही आमची जबाबदारी मानतो, असे ते म्हणाले. याप्रसंगी जयशंकर यांनी नवी दिल्लीत अलिकडेच झालेल्या लष्करप्रमुखांच्या परिषदेचा उल्लेख करताना यामध्ये 30 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाल्याचे नमूद केले. भारत नेहमीच शांतता, सुरक्षा आणि विकासाच्या आदर्शांसाठी वचनबद्ध आहे. आमचे ध्येय एक चांगले आणि सुरक्षित जग निर्माण करणे हे असल्याचेही ते पुढे म्हणाले.

दहशतवादावरील जागतिक ढोंगीपणा उघड

भारताने दहशतवादाच्या मुद्यावर शब्द आणि कृतीमधील अंतर बऱ्याच काळापासून अधोरेखित केले आहे. जागतिक रणनीतीच्या नावाखाली दहशतवादामुळे प्रभावित देश आणि दहशतवाद्यांचे पालनपोषण करणारे देश या दोघांनाही समान दर्जा दिला जात असून ही कृती अत्यंत निंदनीय आणि धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा स्वयंघोषित दहशतवाद्यांना निर्बंध प्रक्रियेपासून संरक्षण दिले जाते, तेव्हा ते दहशतवादाविरुद्ध लढण्याचा दावा करणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते, अशी उपहासात्मक टिप्पणीही त्यांनी केली. संयुक्त राष्ट्र न्याय्य आणि सर्वसमावेशक होईल तेव्हाच दहशतवाद, हवामान संकट, आर्थिक असमानता किंवा भू-राजकीय तणाव यासारख्या जागतिक समस्या सुटतील असेही जयशंकर म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article