For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांधीनगर दंगल प्रकरणातून सर्वजण निर्दोष

10:37 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
गांधीनगर दंगल प्रकरणातून सर्वजण निर्दोष
Advertisement

जेएमएफसी द्वितीय न्यायालयाचा निकाल

Advertisement

बेळगाव : गांधीनगर येथील दंगल प्रकरणातील सर्व संशयितांची जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दुर्गामाता रोड, गांधीनगर येथे फिर्यादी मन्सूर उस्मान देसाई (रा. दुर्गामाता रोड, गांधीनगर) हे बसले असताना दि. 12 जुलै 2015 रोजी रात्री 11 वाजता संशयितांनी त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याचबरोबर कार व मोटारसायकलची तोडफोडही केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र सबळ पुराव्याअभावी या प्रकरणातून 22 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. रमाकांत जयवंत कोंडुस्कर, प्रकाश रामचंद्र वंटमुरकर, पंकज मोहन जाधव, सचिन चव्हाण, सिद्धाप्पा दोडमनी, जगदीश सडलबंदी, संतोष दोडमनी, राजू चौगुले, कुशाल धुडूम, निंगनगौडा पाटील, अक्षय दोडमनी, बलराम दोडमनी, नितीन कुट्रे, महेश खन्नेकर, सुनील हलगेकर, प्रशांत मोदगेकर, सुदर्शन नाईक, मोहन पाटील, टिंकू दोडमनी, विनोद पद्मण्णावर, प्रशांत डांगे, मनोज ताशिलदार (सर्व रा. गांधीनगर) अशी सुटका झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर माळमारुती पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी या सर्वांवर दोषारोप दाखल केले होते. मात्र सबळ पुराव्याअभावी न्यायाधीश पंकजा कोन्नुर यांनी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. या संशयितांच्यावतीने अॅड. प्रताप यादव, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. स्वप्निल नाईक, अॅड. निखिल कुलकर्णी, अॅड. प्रज्वल यांनी काम पाहिले.

Advertisement
Advertisement
Tags :

.